| |

हिवाळ्यात चेहऱ्याची आणि केसांची काळजी कशी घ्याल?; जाणून घ्या टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन। थंडीचे दिवस म्हटले कि सगळ्यात आधी प्रत्येकाला आपल्या त्वचेची चिंता वाटू लागते. कारण कोणताच चेहरा कोणत्याही ऋतूचा मारा सहन करू शकत नाही. यासाठी चेहर्‍याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यात हिवाळ्यातील थंडीमुळे आपली त्वचा शुष्क होते. त्वचेतीळ आद्रता कायम राखायची असेल तर यासाठी पुरेसे पाणी पिणे, माँइश्चराइजर लावणे, ग्लिसरीन व कोल्ड क्रिमचा वापर करणे गरजेचे असते. यामुळे त्वचेची सुंदरता कायम राखण्यास मदत होते. तसेच त्वचेइतकीच काळजी केसांची देखील घ्यावी लागते. थंडीमध्ये केसांमध्ये कोरडेपणा येतो. यामुळे केस तुटणे, रफ होणे अश्या समस्या जाणवतात. म्हणूनच थंडीच्या दिवसात केसांना तेल लावणे, कोरफडचा मास्क वापरणे लाभदायक ठरते. चला तर जाणून घेऊयात हिवाळ्यात अगदी सोप्प्या टिप्सच्या माध्यमातून आपल्या सौंदर्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) ऋतूनुसार आपले फेस वाँश व माँइश्चराइजर क्रिम बदला.

२) सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर जाऊ नका.

३) महिन्यातून एकदा फेशिअल जरूर करा. यामुळे त्वचेला पोषण मिळेल. शुष्क त्वचेला लवकर सुरकुत्या पडतात. यामुळे चेहरा धुतल्यानंतर टोनर व कोल्ड क्रिमचा वापर करा. फेशिअल करतांना सोनोफोरेसिस थेरेपी चा प्रयोग करायचा प्रयन्त करा. यात विटामिन सी व लैक्टिक अँसिडचा वापर केला जातो.

४) मेकअप करण्याचे प्रमाण कमी करा. ऋतू बदलण्याने त्वचा लवकर सुकून जाते. अल्ट्रावाँयलेट किरणांमुळे त्वचेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या ऋतूत त्वचा काळी पडण्याचीही भिती असते. यामुळे मेकअप टाळला तरीही चालेल.

५) दिवसभरात कमीत कमी १० ग्लास पाणी रोज प्या. तसेच रोजच्या आहारात फ्रुट ज्युसचा समावेश करा.

६) रात्री झोपताना बाँडी लोशन लावा. यासाठी कोका बटर व शिया बटर या क्रिमचा वापर करा.

७) नखांची काळजी घ्या. रात्री विटामिन ई ऑईलचा वापर करा.

८) या ऋतूत धुळीमुळे केस शुष्क होतात. यापासून वाचण्यासाठी रोज केस धुवा. कंडिशनर लावा. केस चांगले कोरडे करा.

९) आठवड्यातून किमान २ दिवस तेलाने केसांची मालिश करा.

१०) केस विंचरताना ओढू नका.