If the lips become lifeless in winter ....
|

हिवाळ्यात ओठ हे निर्जीव होत असल्यास या गोष्टी करून पहा

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  हिवाळ्यात आजूबाजूचे वातावरण हे फार थंडीचे असते. अश्या वेळी आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे आपले सारे शरीर हे कोरडे पडायला सुरुवात होते. त्यावेळी आपले पण जास्त प्रमाणात कोरडे पडतात. कोरड्या ओठांमुळे आपल्या सौंदर्यात कमी पणा जाणवायला सुरुवात होते. ओठांची काळजी घेण्यासाठी बाजारपेठेत विविध प्रकाराचे लीपबाम देखील मिळतात जे ओठांना मॉइश्चराइझ करण्याचे काम देखील करतात. या लीपबामचा प्रभाव काही काळच असतो नंतर ओठ पुन्हा कोरडे आणि रुक्ष होतात. त्यामुळे आपले सौदर्य हे अतिशय कमी होण्यास सुरुवात होते.

 

—- दररोज रात्री झोपण्याच्या पूर्वी आपल्या ओठांची काळजी घ्या. या साठी रात्री आपल्या नाभी वर साजूक तूप किंवा नारळाचे तेल लावा. असं केल्याने फाटलेले ओठ चांगले होतील आणि ते नरम होतील. त्यामुळे आपल्या कोरड्या ओठांना नरमपणा जाणवायला सुरुवात होते.

— या शिवाय दररोज झोपण्यापूर्वी ओठांना लोणी किंवा साजूक तूप लावा.

— सकाळी उठल्यावर जे रासायनिक घटक मिळतात त्यांचा वापर हा आपल्या ओठांसाठी केला जावा.

— आपल्या चेहऱ्याला सूट होईल असेच पदार्थ हे आपल्या ओठांना लावले पाहिजे.

—- ओठांवर गुलाबाच्या पाकळ्या भिजवून आपल्या ओठांवर चोळा. हे दररोज केल्याने ओठांचा रंग नैसर्गिक गुलाबी आणि चमकदार दिसेल.

— हिवाळ्याच्या हंगामात जास्त थंडी मुळे तहान लागत नाही आणि त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामापेक्षा कमी पाणी पितो.या मुळे ओठ रुक्ष आणि फाटलेले दिसतात. म्हणून हिवाळ्यात तहान असो किंवा नसो, पाणी वेळोवेळी पिणे आवश्यक आहे. असं केल्याने ओठ मऊ राहतात आणि कोरडेपणा देखील नाहीसा होईल.