How to take care of skin in the cold

थंडीत कशी घ्याल त्वचेची काळजी?

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । भारतात जवळपास नोव्हेंबर पासून थंडी पडायला सुरुवात होते. थंडीच्या दिवसांत आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजचे आहे. अनेक वेळा थंडीच्या दिवसांत आपली त्वचा हि फार कोरडी पडली जाते. त्वचा कोरडी पडल्याने त्या भागातील स्किन निघण्यास सुरुवात होते. थंडीच्या दिवसांत क्रीम वापरणे गरजेचे आहे. क्रीम वापरल्याने चेहरा कोरडा पडण्याचे प्रमाण हे कमी कमी होत जाते.

थंडीमुळे त्वचेतील रक्ताभिसरण मंद होते. त्यामुळे शरीराचं तापमान कमी होतं. आपल्या तेलग्रंथीतून निघणारे एक तेलकट द्रव्य आहे. त्याचे प्रमाण हे कमी कमी होत जाते. हे त्वचेला मुलायम बनवण्यास मदत करते. हिवाळ्यात शरीराचं तापमान कमी होते. त्यामुळे ते त्वचेच्या बाहेरील थरावर येऊ शकत नसल्यानं त्वचा कोरडी वाटते. सीबमची निर्मिती योग्य प्रमाणात होणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात जर योग्य आहार घेतला तर त्याची निर्मिती चेहऱ्यावर योग्य पद्धतीने होते. म्हणून कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चर असलेली ‘कोल्ड क्रीम’ वापरावी .चेहरा धुतल्यानंतर त्या क्रीम चा वापर हा केला जावा.

थंडीचा थेट परिणाम बाह्यत्वचेवर पडतो. कोरडेपणामुळे बाह्यत्वचेवर परिणाम होऊन ते आकुंचन पावतं. स्क्रीन सेल्स तुटण्यास सुरुवात होते. त्वचेवर हा परिणाम काही दिवसांनंतर दिसायला लागतो. साबण अथवा फेसवॉशने त्वचा कोरडी पडते, असाही समज आहे. त्यात तथ्य आहे. कारण साबण किंवा फेसवॉशने चेहरा धुतल्यास कोरडा पडतो. त्वचेतील नैसर्गिक मॉइश्चर कमी होते. म्हणून चेहरा फक्त पाण्याने धुवावा .