| |

दातांची काळजी कशी घ्यावी?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोणत्याही व्यक्तीच्या सौंदर्यात सर्वात जास्त अगदी ठळकपणे उठून दिसतात ते केस, डोळे, नाक आणि दात. या चार घटकांपैकी एकात जरी दोष असेल तरीही आपल्या सौंदर्याला गालबोट लागल्याचे वाटते. अनेकदा आपण केस, डोळे आणि नाक यांकडे प्रामुख्याने लक्ष देतो पण दातांचं काय? त्यांची काळजी कोण घेणार? आपला आहार, पचनक्रिया, भाषा, या गोष्टीसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दात गरजेचे तितकेच कारणीभूत ठरतात. त्यामुळे दातांची निगा योग्यरीत्या राखणे अत्यंत गरजेचे आहे.

० दातांची काळजी कशी घ्यावी?
– तुम्हीही कितीही व्यस्त असाल तरीही दातांची काळजी घेण्यासाठी काही क्षण खूप गरजेचे आहेत ते द्याच. कारण यासाठी खूप तास लागत नाहीत अगदी मिनिटांचा प्रश्न असतो. दातांवर जेवणाचे कण अडकू न देणे, सकाळी आणि रात्री नियमित दात घासणे, जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरणे, डॉक्टरांनी सांगितलेल्या पध्दतीने दात स्वच्छ करणे याकडे लक्ष द्या.

– दात खराब होण्याचे २ प्रकारचे आजार असतात.
• दात किडणे (दातांना कीड लागणं)
• दातांच्या हिरड्या आणि हाड खराब होणे ( हिरड्यांना कीड लागणं)
दातांचे हाड आणि हिरड्या खराब होण्याच्या आजाराला पायोरिया (Periodontitis/Pyorrhoea) असं म्हणतात. हा आजार हिरड्या आणि हाड खराब झाल्यामुळे होतो. याचे मुख्य कारण म्हणजे जेवणाचे कण दातात अडकणे. यात – हिरडीला सुज येणे, हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे, तोंडातून दुर्गंधी येणे, दात कमकुवत होऊन हलणे अश्या समस्या निर्माण होतात.

० दात स्वच्छ करण्याची योग्य पध्दत :- अनेक लोकांना बाथरूमच्या टाईल्स घासाव्या अश्या पद्धतीने दात घासायची सवय असते. मात्र हि सवय अतिशय अयोग्य आहे. यामुळे दात झिजतात आणि हिरड्या कमकुवत होतात. त्यामुळे खालीलप्रकारे दात स्वच्छ करा.
१) दातांवर आणि हिरडीवर ४५ अंश कोनात १०/१५ वेळा हलक्या हाताने ब्रश मागे-पुढे करणे.
२) दातांच्या आतल्या बाजूसदेखील ब्रश करणे आवश्यक.
३) दातांच्या चावण्याचा पृष्ठभागावर ब्रश करणे.
४) ब्रशच्या शेंड्याचाही वापर करणे.
५) ब्रशच्या सहाय्याने जिभेवरील प्लाक काढणे.

० महत्वाच्या टिप्स –

१) दिवसभरातून किमान २-३ वेळा वा प्रत्येक जेवणानंतर दात घासणे आवश्यक आहे.

२) ब्रश हिरड्यांवरुनही हलक्या हाताने फिरवला पाहिजे. जेणेकरुन हिरड्यांची मसाज होऊन हिरड्यांमधील रक्तप्रवाह वाढतो.

३) ब्रशने दात घासल्यानंतर Dental floss किंवा Proxa ब्रशने प्रत्येक दोन दातांमधील अडकलेले जेवणाचे कण स्वच्छ करा.

४) माऊथ वॉशचा वापर करावा. यामुळे तोंडातील आम्ल‌ PH नाहीसा होतो. त्यामुळे दातांवर आणि हिरडीवर असलेले कीडजन्य जंतू कमी होण्यास मदत होते.