| | |

उपवास करत असाल तर फळाहार जरूर करा.. कारण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात शारदीय नवरात्रीचा महाउत्सव सुरु आहे. या उत्सवाला एक विशेष अध्यात्मिक बाजू आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांची आराधना केली जाते. त्यामुळे या दरम्यान अनेक लोक देवी मातेची कृपा दृष्टी राहावी म्हणून नवरात्रीचे कडक उपवास करतात. या उपवासादरम्यान फळे आणि सकस आहार इतकेच सेवन केले जाते. पण काही लोक हे देखील खात नाहीत. तर अश्या उपवास कर्त्यांना आम्ही सांगू इच्छितो कि, फळे आणि पाणी हे दोन्ही उपवास असताना घेणे शरीरासाठी आवश्यक असते. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही आणि तुमच्या आरोग्याचे नुकसानही टळेल. अनेकदा असे होते कि उपवासानंतर आजारपण येते. तर अश्यावेळी फळाहार घेणे गरजेचे असते. कारण शरीर डिहाइड्रेत होण्यापासून वाचवायचे असेल तर फळाहार जरुरी आहे.

१) कच्ची केळी – कच्च्या केळ्यामध्ये मुम्बालक प्रमाणात फायबर असते. यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे नवरात्रीच्या उपवासादरम्यान कच्च्या केळीची खीर, भाजी, टिक्की असे पदार्थ खाता येतील. हे पदार्थ चविष्ट आणि तितकेच आरोग्यदायी आहेत.

२) रताळे – रताळे आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी लाभदायी असते. शिवाय यात पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियमयासारखे पोषक घटक मुबलक प्रमणात असतात. हे घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. त्यामुळे नवरात्रीच्या उपवासामध्ये शिजवलेले रताळे, रताळ्याची भाजी, किस वा खीर बनवून खाऊ शकता.

३) शिंगाडा – शिंगाडा हे एक फळ आहे आणि यात व्हिटॅमिन बी, सी, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने यासारखे पोषक घटक असतात. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यास मदत होते. शिवाय मधुमेहासारख्या आजारांपासून हे फळ दूर ठेवते. त्यामुळे उपवासादरम्यान शिंगाड्याचे थालीपीठ, वडा, उपीट वा पुरी खाता येईल.

४) करांदे – करांदे हे एक कंदमूळ आहे. जे प्रामुख्याने कोकणात अधिक प्रसिद्ध आहे. या फळाचे सेवन केल्यास शरीरातील अनावश्यक घटक निघून जातात आणि शरीर आतून स्वच्छ होते. शिवाय करांदे खाल्ल्यामुळे शारीरिक ऊर्जा टिकून बराच काळ पोट भरलेले राहते. त्यामुळे उपवासादरम्यान करांदे उकडून खाता येतील. शिवाय त्याची भाजी वा किस देखील खाता येईल.

५) दुधी भोपळा – दुधी भोपळ्यामध्येदेखील भरपूर पाणी असते. यामुळे उपवासादरम्यान दुधी भोपळा जरूर खावा. तसेच दुधी भोपळ्याचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी लाभदायी आहे. तसेच शरीरातील उष्णता कमी होण्यासदेखील मदत मिळते.

६) याशिवाय उपवासादरम्यान शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी खालील फळेदेखील खाता येतील.
– शहाळे
– काकडी
– खरबूज
– टरबूज

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *