wife's pregnancy

आपल्या पत्नीच्या प्रेगन्सी मध्ये पतीने  कश्या प्रकारे घ्यावी काळजी

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आपल्या घरातील एखादी स्त्री हि जर प्रेग्नंट असेल तर त्यावेळी घरातील इतर सदस्यांना पण खूप काळजी घ्यावी लागते. त्या काळात महिलांना जास्त आधाराची गरज असते . अश्या वेळी पती म्हणून प्रत्येक स्त्रीला खूप अपेक्षा असतात पतीकडून केलेली काळजी हि पत्नीला जास्त भावते. त्यामुळे त्या काळात पत्नीला मानसिक आणि इतर आधाराची सुद्धा जास्त गरज असते. त्यावेळी कश्या प्रकारे काळजी घटली पाहिजे याची माहिती घेऊया ….

— पत्नीला त्या काळात आधाराची गरज जास्त असते त्यामुळे त्या काळात जास्त करून व्यसने करू नयेत . कोणतेही व्यसन करू नये त्यामुळे त्यांना श्वसनाचे आजार निर्माण होऊ शकते.

— प्रेग्नन्सी वरची चांगली पुस्तके आणून द्यावी. दोघांनी वाचावीत. त्यामुळे महिलांना खूप मदत मिळते .

—- घरात प्रसन्न वातावरण, हसरे , पॉसिटीव्ह खेळीमेळीचे असावे. त्यामुळे महिलांचा तणाव हा काही काळ कमी होऊ शकतो.

— पत्नी नीट जेवण, औषधें वैगरे घेते का ते पाहावे.

— ज्या गोष्टीने वाद वाढू शकतात असे वादातीत विषय टाळावेत. टेन्शन देऊ नये. घेऊ पण नये. संयम बाळगावा.

— तिला जड वस्तू उचलू देऊ नये.

— डॉक्टर कडे जाताना शक्यतो दोघांनी बरोबर जावे. त्यामुळे त्या काळात महिलांना जास्त आधार गरज मिळतो.

— बायकांना सकाळच्या वेळेस जास्त त्रास होतो. नवऱ्याची पूर्ण साथ असली पाहिजे.

— बायकांना सतत बाथरूम ला जावे लागते. बाहेर कुठे गेला तर नवऱ्याने चिडचिड करू नये. त्याने संवेदनशील असावे.

— डिलिव्हरीची तयारी सुद्धा आधीच करून ठेवावी. त्यामुळे महिलांना खूप मदत होते.