| |

क्लीन फेससाठी शुगर स्क्रब कसा वापरावा?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुंदर त्वचेसाठी आपण कितीतरी काही ना काही उपाय करतच असतो. इतकंच काय तर आपण आठवड्यातून चार चार वेळा पार्लरमध्ये जात असतो. कित्येक महागड्या ट्रीटमेंट करून आपण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. पण एवढं सगळं करताना आपला वेळ आणि पैसे दोन्ही अमाप वाजत असल्याचे आपल्या लक्षातही येत नाही. म्हणून आम्ही तुम्हाला एक सोप्पा उपाय सांगणार आहोत. जो तुम्ही घरच्या घरी वापरून आपला चेहरा आतून स्वच्छ ठेवू शकाल आणि नैसर्गिक सौंदर्य मिळवू शकालं. यासाठी आपल्याला फक्त साखर हवी आहे. होय कारण साखरेच्या सहाय्याने आपण आपल्या अचेहऱ्याची काळजी घेऊ शकतो. जर त्वचेवर मुरूम असतील किंवा डर्ट असेल तर साखरेसारखा दुसरा पर्याय नाही. शिवाय साखर निरोगी त्वचेसाठी फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊयात साखरेचा कसा वापर केल्यास त्वचेला काय फायदे मिळतात खालीलप्रमाणे:-

१) साखर – लिंबू – ऑलिव्ह ऑइल
– आपल्या त्वचेवरील चमक टिकून राहण्यासाठी शुगर स्क्रबचा वापर करा. यासाठी साखरेत १/२ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळून हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. पुढे फक्त २ मिनिटे मसाज करा. यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. हि प्रक्रिया एका आठवड्यात किमान २-३वेळा करा. यामुळे चेहऱ्यांवरील ब्लॅकहेंड्स कमी होतील आणि आपला चेहरा चमकदार होईल.

२) साखर – दही
– साखर आणि दही प्रत्येकी एक एक चमचा एकत्र करून त्याची व्यवस्थित पेस्ट बनवा. यानंतर चेहऱ्यावर हे मिश्रण हलक्या हाताने स्क्रबरप्रमाणे चोळा. पुढे १५मिनिटे अगदी हलक्या हाताने मसाज करून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचेवरील डेड स्कीन निघून जाते आणि त्वचा सुंदर तितकीच उजळ होते.

३) साखर – दही – लिंबू
– चेहरा स्वच्छ करण्यासाठी साखर आणि लिंबाचे मिश्रण लाभदायी आहे. तर दह्यामुळे चेहऱ्याला मॉइश्च मिळते. यासाठी एका बाऊलमध्ये १ चमचा साखर, १ चमचा दही आणि १/२ चमचा लिंबाचा रस टाका. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्यावर लावा. पुढे १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात. तसेच मुरूम निघून जातात आणि चेहरा चमकतो.

४) साखर – बदाम ऑइल – मध – कॉफी
– आपल्या चेहऱ्यावर डाग किंवा पिंपल्स असतील तर १ चमचा साखर घ्या आणि यात २-३ थेंब बदाम ऑइल, १/२ चमचा मध, १/४ चमचा कॉफी मिसळा. याची एकत्रित व्यवस्थित पेस्ट बनवा आणि हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. यानंतर १० मिनिटांनी आपला चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात तसेच डेड स्किन निघून जाते आणि मुरुमाची समस्याही दूर होते.