Mask washing methods
|

मास्क कसे धुतले जावे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । कोरोनाचे वाढते संकट पाहता आपल्याला खूप काळजी हि घ्यावी लागते सरकारने काढलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येकाने मास्क आणि सानिडायझर वापरले गेले पाहिजे. कोरोना हा संसर्गजन्य  आजार आहे . त्याची लागण एकाला झाली बऱ्याच लोकांना होऊ शकते . त्यामुळे मास्क हे वापरणे आवश्यक आहे . मास्क हे एकदा वापरले की त्याचा वापर हा सतत करायचा नसतो. मास्क वापरल्यानंतर तो स्वच्छ धुतल्यानंतरच तो वापरला जावा. त्यामुळे मास्क धुण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत. ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ….

बाहेर जाताना कमीतकमी आपला चेहरा हा अजिबात उघडा ठेवू नका त्यामुळे सुद्धा संसर्ग हा जास्त जाणवू शकतो. मास्कचा वापर करत असाल तर तो धुणे खूप आवश्यक आहे . इतर मास्क वापरण्यापेक्षा कापडी मास्क आपल्या शरीराला योग्य राहील.  कापडी मास्क हा वापरणे आणि धुणे दोन्ही सोपे आहे. अश्या वेळी आपण घरगुती पद्धतीने सुद्धा मास्क स्वच्छ करू शकतो. तुम्ही बाहेरून आला असाल तर अश्या वेळी वापरलेला मास्क हा अजिबात तसाच ठेवू नका. तो स्वच्छ केल्यानंतरचा तो घरात घ्या. त्यासाठी स्वच्छ करण्याच्या पद्धती जाणून घेऊया …

बादली भर गरम पाण्यात डिटर्जंट घाला. काही मिनिटे आपला मास्क हा तसाच पाण्यात भिजत ठेवा, आपल्या हाताने त्याला चोळा .नंतर हाताने चोळून परत सौम्य गरम पाण्यात घालून पिळून घ्या आणि वाळवा. हा मास्क तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये धूत असाल तर त्यावेळी तुम्ही तर गरम सेटिंगवर ठेवा. जेणे करून सर्व जंतू मरतील.नंतर या मध्ये डिटर्जंट घाला.

मास्क साठी चार चमचे ब्लीच घालून गरम पाण्यात भिजत ठेवा.

— कोरोनाचे संक्रमण दूर होण्यासाठी ब्लीच घातले जाते.

— आपल्या त्वचेला या मुळे काही इजा होणार नाही याची खबरदारी घ्या.

— ब्लीच वापरताना त्याची अंतिम तपासणी करून घ्या. त्याची शेवटची तारीख पाहणे खूप आवश्यक असते.

— घरगुती ब्लीच कधीही अमोनिया किंवा इतर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या क्लीनर मध्ये मिसळू नका.

— स्वच्छ धुतल्यानंतर उन्हात जास्त काळ वाळवा.