|

टायफॉइड झाल्याचे कसे ओळखालं?; जाणून घ्या लक्षणे, परिणाम आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाच्या दिवसात कितीतरी संसर्गजन्य रोगांना उभारी येते. यात प्रामुख्याने मलेरिया, हिवताप, डेंग्यू, कावीळ आणि टायफॉइडचा समावेश असतो. या सर्व आजारांची सर्वसाधारण लक्षणे अगदी सारखी असतात. मात्र आजार? वेगवेगळे. यातील टायफॉइडला मराठीत ‘विषमज्वर’ किंवा ‘मुदतीचा ताप’ असे म्हणतात. ‘सालमोनेला टायफी’ या जीवाणूचा संसर्ग झाल्याने टायफॉइड होतो. हे जीवाणू रुग्णाच्या शौच आणि मूत्रामधून सर्वत्र हवेत पसरतात. प्रत्यक्ष आजार न झालेल्या व्यक्तीच्या माध्यमातूनदेखील हे जीवाणू पसरतात. तसेच टायफॉइडमधून बरा झालेला रुग्णदेखील या जीवाणूचा वाहक असू शकतात. मुख्य म्हणजे, या जीवाणूचा अन्नमार्गात प्रवेश झाल्याशिवाय टायफॉइड होत नाही. यासाठी, शौचानंतर हात गडबडीने धुणे किंवा स्वच्छ न करणे आणि अशा हातांनी अन्नावाटप करणे हे टायफॉइड होण्यामागील मुख्य कारण आहे. तसेच शौचावर बसलेल्या माशा उघड्या अन्नावर बसून अन्न दूषित करतात. यामुळेदेखील टायफॉइडचा फैलाव होतो. इतकेच नव्हे तर पाण्यातूनही याचा प्रसार होतो.

० टायफॉइड झाल्याची लक्षणे – टायफॉइडचा प्रसार करणाऱ्या जीवाणूचा पेशीमध्ये प्रवेश झाल्यापासून टायफॉइडची लक्षणे उघड दिसण्यासाठी किमान १० ते १४ दिवस अर्थात कमीत कमी २ आठवड्यांचा कालावधी लागतो. हि लक्षणे खालीलप्रमाणे असतात:-
१) अस्वस्थ वाटणे
२) अशक्तपणा येणे
३) गारठा नसतानाही थंडी लागणे
४) ताप येणे
५) सांधेदुखी
६) मळमळणे
७) उलट्या होणे
८) पोटात मुरडा होणे
९) पोटात सारखी कळ येणे
१०) रक्तमिश्रित जुलाब होणे
११) छातीवर, पोटावर आणि मांड्यांवर लालसर पुरळ येणे

० परिणाम –
१) टायफॉइडमुळे कधीकधी यकृत आणि प्लीहेस यांवर सूज येते.
२) प्लीहा फुटणे
३) रक्तक्षय
४) रक्तातील तांबड्या पेशींचे प्रमाण कमी होणे
५) लहान आतड्यांमध्ये रक्तस्राव होणे
६) सांध्यामध्ये जीवाणूसंसर्ग होणे इ. परिणाम होऊ शकतात.
७) याशिवाय हृदय, मेंदूआवरण आणि मेंदूमध्ये संसर्ग झाल्यास कोमा किंवा मृत्यू संभवतो.

० उपाय –
१) सगळ्यांत महत्वाची बाब म्हणजे आसपास स्वच्छता राखणे.
२) खाण्यापिण्यात योग्य बदल करावा. पचण्यास जड असणारे पदार्थ टाळावे.
३) आहारात प्रामुख्याने पालेभाज्या आणि फळांचा समावेश करावा.
४) तुळशीच्या पानांचे वा रसाचे सेवन करावे.
५) सफरचंदाच्या रसात आल्याचा रस मिसळून त्याचे सेवन करावे.
६) शुद्ध तुपात लसणीच्या ५ ते ७ पाकळ्या भाजून त्यात सैंधव मीठ घालून त्याचे सेवन करणे.
७) आठ काप पाण्यात ७ ते ८ लवंग मिसळून पाणी उकळावे. हे पाणी अर्धे झाल्यावर अख्ख्या दिवसात थोडे थोडे प्यावे.
८) कोमट पाण्यात मध मिसळून आठवडाभर प्यावे.

० महत्वाचे:- हे उपाय करूनही आराम मिळत नसेल तर अधिक वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.