| |

आईस्क्रीमसुद्धा देते आरोग्याशी संबंधित फायदे; माहित नसेल तर जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आईस्क्रीमचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी फ्लेवर कोणता ते महत्वाचं नसत ते खायला हवं इतकंच कळतं. थोडी गर्मी जाणवली कि आपण थंड पदार्थ खाण्याचा विचार करतो. यात प्रामुख्याने आईस्क्रीमचा समावेश असतो. आईस्क्रीम म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचा जणू जीव का प्राण. पण अधिक आईस्क्रिम खाल्ल्यामूळे सर्दी, पडसे आणि खोकल्याचा त्रास होतो, असे सांगत आपण लहान मुलांना आईस्क्रिम खाण्यापासून दूर करतो. चला हे मान्य कि थंडीच्या किंवा पावसाच्या दिवसात आईस्क्रीम खाणे खरोखरीच आरोग्यासाठी नुकसानदायी भूमिका निभावू शकते. मात्र अन्य दिवसांत प्रमाणात आईस्क्रिम खाल्ल्यास आरोग्याला फायदादेखील होतो, हे किती लोक जाणतात?

तर, आईस्क्रिम हे आरोग्यदायी असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे. हावर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ रिसर्चच्या अभ्यासाप्रमाणे, आईस्क्रिममध्ये नाइसिन, थाइमिन आणि व्हिटामिन A,D,B हे घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे प्रमाणात आईस्क्रिम खाल्ल्याचा आरोग्याला पुरेपूर फायदा होऊ शकतो.

१) उर्जा स्त्रोत – आईस्क्रिममध्ये कार्ब्स, फॅट्स आणि प्रोटीन हे घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे शरीराला आवश्यक तितकी उर्जा मिळते.

२) मेटाबॉलिझम – आईस्क्रिममध्ये बी ६ व्हिटॅमिन अतिशय प्रमाणात उपलब्ध असते. यामुळे शरीरातील मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते.

३) डोळ्यांसाठी फायदेशीर – आईस्क्रिममध्ये व्हिटॅमिन ए समाविष्ट असते. जे डोळ्यांच्या आरोग्याला अतिशय फायदेशीर ठरते आणि दृष्टी सुधार होतो.

४) रक्तप्रवाह सुधार – आईस्क्रिममध्ये आढळणारे व्हिटॅमिन के शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करतात. यामुळे शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा सुरळीतपणे होतो.

५) कॅल्शियम – आईस्क्रिममध्ये व्हिटॅमीन डी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील प्रत्येक स्नायू आणि हाडांमध्ये कॅल्शियमचे शोषण होण्यास उत्तमरीत्या मदत होते.

६) स्मरणशक्ती तल्लख – आईस्क्रिममध्ये बी १२ व्हिटॅमिन असते. हे व्हिटॅमिन स्मरणशक्ती तल्लख राहण्यास अत्यंत मदतयुक्त ठरते.

७) अ‍ॅसिडीटीवर परिणामकारक – अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी व्हेनिला आईस्क्रिम मदत करते. व्हेनिला आईस्क्रिम हे कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह न मिसळता, घरच्या घरी किंवा शुद्ध स्वरूपात बनवलेले असेल तर आणखीच फायदा होतो. यामुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास लगेच कमी होण्यास मदत होते.

८) वजन कमी करणे – वजन कमी करण्यास आईस्क्रिम मदत करते. कारण आईस्क्रिम थंड स्वरूपाचे असते. त्याला सामान्य स्थितीमध्ये आणण्यासाठी शरीराला मेहनत घ्यावी लागते. परिणामी यामुळे वजन घटवण्यास मदत होते.