Delta v/s Omicron
| |

लक्षणांवरून ओळखा डेल्टा आणि ओमिक्रॉन संसर्गाची बाधा; जाणून घ्या लक्षणे आणि फरक

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या थंडीचा हंगाम सुरु आहे. नुसता सुरु नाही तर चांगलाच कडाडला आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे थंडीचा वाढता पारा जणू अंग गोठवणारा असल्याचे भासू लागले आहे. अशातच पुन्हा एकदा जगभरात धुमाकूळ घातलेला संसर्गजन्य विषाणू कोविड १९ ने डोकं वर काढलं आहे. पण यावेळी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने कहर करायला सुरुवात केली आहे. म्हणून असे समजून चालणार नाही कि, कोरोनाचा डेल्टा प्रकार निष्क्रिय झाला आहे. कारण सद्याची वाढत्या रुग्णांची परिस्थिती पाहता कोरोनाचा डेल्टा आणि ओमिक्रॉन दोघेही समान कामगिरीवर असल्याचे दिसत आहे. पण यामुळे झालेय असे कि, सध्या सुध्या आजाराला देखील लोक कोरोना समजायची चूक करत आहेत. तर कोरोना झालेले रुग्ण साधा सुधा आजार समजून दुर्लक्ष करीत आहेत. अश्यावेळी रुग्णांना झालेल्या संसर्गाच्या लक्षणांची योग्य आणि पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. कारण थंडीमध्ये सगळ्यात सामान्य समस्या आहे सर्दी. सर्दीची लक्षणे बऱ्यापैकी ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकारांच्या लक्षणांसारखी असल्यामुळे गडबड होऊ शकते. आता यातील फरक कसा ओळखायचा…? हेच आज आपण जाणून घेणार आहोत खालीलप्रमाणे:-

० सर्दीची लक्षणे –

COMMON COLD
  • नाक वाहणे.
  • कफ होणे.
  • डोकेदुखी
  • खोकला आणि नाक बंद होण्याची समस्या.
  • वरील समस्या खूप वाढतात तेव्हा तापासारखा अनुभव येतो.


० डेल्टाची लक्षणे –

DELTA VARIANT

डेल्टा हा कोरोनाच्या विषाणूचा व्हेरियंट आहे. यात खालील लक्षणे जाणवतात.

  • घसा खवखवणे.
  • नाक वाहणे.
  • तीव्र डोकेदुखी.
  • यानंतर जिभेची चव जाणे.
  • गंध न समजणे.

० ओमिक्रॉनची लक्षणे –

OMICRON VARIANT

ओमिक्रॉन हा कोरोनाच्या विषाणूचा नुकताच समोर आलेला व्हेरियंट आहे. ज्याच्या संसर्गाची तीव्रता अधिक आहे. यात खालील लक्षणे जाणवतात.

  • छातीत जळजळ होणे.
  • घसा खवखवणे.
  • सर्दी होणे.
  • शिंका येणे.
  • तीव्र डोकेदुखी होणे.
  • सांधेदुखीमुळे शरीर तुटायला लागणे.
  • खूप अशक्तपणा येणे.
  • तीव्र थरकापासह ताप येणे.

० डेल्टा आणि ओमिक्रॉनमधील फरक समजून घ्या.

DELTA v/s OMICRON
  • डेल्टा आणि कोरोनामधील मुख्य फरक म्हणजे जेव्हा डेल्टाचा संसर्ग होतो तेव्हा चव आणि वास निघून जातो. मात्र ओमिक्रॉनच्या संक्रमणाने असे घडत नाही.
  • डेल्टा संसर्गादरम्यान श्वसन समस्या उद्भवतात. मात्र, ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये ही समस्या दिसून येत नाही.
  • डेल्टा संसर्गामध्ये हा विषाणू थेट माणसाच्या फुफ्फुसावर हल्ला करतो. तर,ओमिक्रॉन घशातील समस्या वाढवतो आणि वरील श्वसनमार्गाला संक्रमित करतो.