Brain Diseases
|

मेंदूच्या नसा कमकुवत झाल्या तर…?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मानवी शरीरातील मेंदू हा अवयव अत्यंत महत्वाचा आहे. कारण मेंदू आपल्या शारीरिक हालचाली नियंत्रित करीत असतो. त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी मेंदूचे निरोगी असणे आवश्यक आहे. पण अनेकदा तुम्ही अनुभवले असाल कि, अख्खा दिवस काम केल्यानंतर अचानक डोकं दुखी लागत. याशिवाय खूप वेळ मोबाईल, कॉम्प्युटर यासारख्या डिजिटल स्क्रीनचा वापर केल्याचं डोक्यात कळ येते. बहुतेकदा एखाद्या तीव्र वासामुळेदेखील अर्ध शीशीचा त्रास होऊ शकतो. याचे कधी कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहात का? नाही? तर आधी कारण जाणून घ्या.

अचानक डोकेदुखी मागे अनेक कारणे असू शकतात. मात्र त्या प्रत्येक कारणातील महत्वाचे कारण म्हणजे मेंदूची अस्वस्थता. अनेकदा मेंदूच्या नसांमध्ये वेदना निर्माण झाल्यामुळे डोकेदुखी जाणवते. हि डोकेदुखी अचानक बंददेखील होते. त्यामुळे या वेदनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. याचा परिणाम म्हणजे आरोग्याचे नुकसान. कारण मेंदू आपल्या सर्व मज्जातंतूंशी जोडलेला असतो. यामुळे मेंदू अस्वस्थ झाल्यास संपूर्ण शारीरिक हालचालींवर आणि मूडवर फरक पडतो. यामुळे अनेकदा शारीरिक थकवा देखील येतो आणि अनेकदा दीर्घकाळ आजारपणसुद्धा येऊ शकतं. त्यामुळे वेळीच मेंदूच्या कमकुवतपणाची लक्षणे आणि कारणे समजून घ्या. शिवाय त्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर उपाय करा. अन्यथा मेंदूच्या कमकुवतपणामुळे आरोग्याची मोठी हानी होऊ शकते.

० मेंदूच्या कमकुवतपणाची कारणे खालीलप्रमाणे :-

1) मेंदूला दुखापत झाल्यास वेळीच उपाययोजना न केल्यामुळे मेंदूच्या दुखावलेल्या नसा अकार्यक्षम होतात.

2) शरीरातील काही पोषक घटकांची कमतरता मेंदूच्या नसांवर दबाव निर्माण करते आणि यामुळे मेंदू कमकुवत होतो.

3) संसर्ग बाधा यामुळेदेखील मेंदूच्या नसा कमकुवत होतात आणि डोकेदुखी जाणवते.

4) काही औषधांमुळे मेंदूच्या नसांमध्ये कमजोरी येण्याची शक्यता असते.

० मेंदूच्या कमकुवतपणाची लक्षणे खालीलप्रमाणे :-

1.तीव्र डोकेदुखी / अर्धशिशी

2.हातपाय सुन्न पडणे

3.शरीरात मुंग्या येणे

4.शारीरिक थकवा

5.मूड स्विंग

० मेंदूच्या कमकुवतपणामुळे काय परिणाम होतो?

विविध कारणांमुळे मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये कमकुवतपणा येतो. अशा प्रकारे मेंदूच्या कमकुवतपणामुळे सर्व पेशींपर्यंत ऑक्सिजन आवश्यक तितक्या प्रमाणात पोहोचत नाही. यासोबतच कधी कधी मेंदूच्या विशिष्ट भागाकडे जाणार्‍या नसांमध्ये रक्त साचून राहते. योग्य पद्धतीने रक्ताभिसरण क्रिया होत नाही. परिणामी तीव्र डोकेदुखीचा त्रास संभवतो.

इतकेच नव्हे तर मेंदूच्या नसा कमकुवत झाल्यामुळे आपल्या मानसिक क्षमतेवर गंभीर स्वरूपाचे परिणाम होऊ शकतात. अनेकदा यामुळे विस्मरण अर्थात स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता असते. इतकेच नव्हे तर यामुळे माणसाची बोलण्याची आणि समजण्याची क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक असते.