Child Eating Food
| | |

काहीही खाल्लं तरी मुलांचं वजन वाढत नसेल तर ‘हे’ पदार्थ मुलांना जरूर द्या; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ओनलाईन। आपली मुलं काय खातात? किती खातात? याकडे पालकांचे अगदी बारीक लक्ष असते. कारण आपला आहार आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतो. पण मुलांना काहीही खायला द्या.. ती व्यवस्थित खातच नाहीत असा अनेक पालकांना अनुभव असेल. मग यामुळे मुलांना योग्य पोषण मिळत नाही. परिणामी मुलांची शरीरयष्टी सडपातळ राहते. मुलांचं वजन संतुलित राहत नाही. परिणामी मुलांचा विकास खुंटतो. यामुळे आपल्या पाल्याचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला व्हावा यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला योग्य तो पर्याय मिळत नसेल. तर काळजी करू नका. आजचा हा लेख पूर्ण वाचा आणि समाधान मिळवा.

कमी वजनाच्या मुलांच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या पालकांसाठी आजचा लेख अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी मुलांच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे, यामुळे मुलांचे आरोग्य योग्य राहील. संतुलित आहारामुळे मुलांचा विकास होण्यास मदत मिळते. अनेकवेळा एखाद्या आजारामुळे मुलाचे वजन वाढत नाही. मात्र जर मुलांच्या आहारात खाली सांगितलेल्या पदार्थांचा समावेश असेल तर निश्चितच मुलांच्या सर्वांगीण विकासास फायदा होईल. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) दुग्धजन्य पदार्थ –
दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रोटीन आणि चरबी मुबलक प्रमाणात असते. यामुळे वजन वेगाने वाढते. सोबतच कॅल्शियमही मुबलक प्रमाणात याच्या मदतीने मुलांची हाडे मजबूत होतात आणि त्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळॆ मुलांच्या आहारात दूध, पनीर, चीज, लोणी, दही आणि तूप यांचा समावेश करा.

२) केळी –
केळ्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. शिवाय यातील कॅलरीज आणि लोह मुलांच्या शरीरात ऊर्जा साठविण्यास मदत करते. तसेच या प्रत्येक घटकामुळे शरीराचे वजनही वाढते. यासाठी मुलांना केळ्याचे फ्रूट सॅलड, मिल्कशेक किंवा फक्त केळी खायला देऊ शकता.

DryFruits

३) सुका मेवा –
सुका मेवा खाल्ल्याने मुलांचे वजन झपाट्याने वाढते. कारण यामध्ये प्रथिने आणि फायबरयुक्त अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत, मेंदू कार्यक्षम आणि शरीर विकसित होऊ लागते. सुका मेव्यात भरपूर कॅलरीज असतात. यासाठी मुलांना बदाम भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खायला द्या. याशिवाय बदाम, खारीक, अक्रोडची पावडर दुधात मिसळून दिल्यासही वजनात फरक पडेल.

४) ओट्स –
ओट्समध्ये भरपूर फायबर असते. यामुळे आतड्याची हालचाल आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. शिवाय यातील लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि थायामिन मुलांच्या सर्वांगीण विकासाला मदत करतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात विविध फळांसोबत मुलांना ओट्स खायला द्या.

५) बटाटे –
बटाट्यातील कार्बोहायड्रेट वजन वाढवण्यास मदत करतात. याशिवाय बटाट्यातील कार्बोहायड्रेट्स, अमिनो ॲसिड आणि फायबर आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच बटाट्याप्रमाणे लहान मुलांसाठी रताळेदेखील फायदेशीर आहे.

६) चिकन –
चिकनमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. जे लहान मुलांच्या स्नायूंच्या विकासासाठी मदत करतात. यासोबतच नवीन पेशींच्या निर्मितीसाठीही प्रोटीन उपयुक्त ठरते. म्हणून लहान मुलांना चिकन करी किंवा चिकन फ्राय देऊ शकता. जर मुलं खूप लहान असेल तर त्यांना चिकन सूप प्यायला द्या. यामुळे मुलांचे वजन झपाट्याने वाढते.

७) अंडी –
अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि हेल्दी फॅट्स असतात. जे मुलांचे वजन वाढण्यास मदत करतात. यामुळे मुलांना निमित्त एक उकडलेले अंडे खायला द्या. अंड्याचे सेवन केल्याने मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासात मदत होते.