| |

डोळ्याजवळ कोलेस्ट्रॉल जमा झालं तर घाबरू नका, ‘हे’ उपाय करा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या शरीरासाठी कोलेस्ट्रॉलचे अति प्रमाण अत्यंत घातक असते. कारण कोलेस्ट्रॉल वाढू लागले की, त्याचे परिणाम आपसूकच चेहऱ्यावर दिसतात. यामुळे काही लोकांच्या अगदी डोळयांजवळसुद्धा कोलेस्ट्रॉल जमा झाल्याचे जाडसर खुणांच्या माध्यमातून दिसते. प्राथमिक लक्षण पाहता या खुणा त्वचेच्या समस्यांपैकी एक वाटतात. त्यामुळे या समस्येवर आधी त्वचा रोग समजून उपाय केले जातात. मात्र तपासणीनंतर हे कोलेस्ट्रॉलच्या खुणा असल्याचे समजते. त्यामुळे डोळ्याजवळही अशा खुणा निर्माण झाल्या तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. शिवाय जाणून घ्या डोळ्याजवळ कोलेस्ट्रॉलच्या खुणा आल्याचं तर कश्या दुर करता येतील खालीलप्रमाणे –

१) लेझर ट्रिटमेंट – लेझर ट्रिटमेंटच्या सहाय्याने डोळ्याजवळ जमा झालेलं कोलेस्ट्रॉल कमी करता येते. अगदी कोणत्याही वेदनेशिवाय सहजपणे लेझरने जाळून हे कोलेस्ट्रॉल कमी करता येते. अशा ट्रिटमेंटनंतर त्वचा पूर्ववत होण्यास १-२ आठवडे लागतात. मात्र ही ट्रिटमेंट अधिकृत लेझर उपचार करण्याऱ्या क्लिनिकमध्येच करा.

२) इलेक्ट्रिक नीडल – डोळ्याजवळील कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी इलेक्ट्रिक नीडल वापरले जातात. या उपचारात सुईच्या मदतीने त्वचेवरील कोलेस्ट्रॉल जमा झालेला भाग जाळून टाकतात. शरीरात स्वयंनियंत्रित व्यवस्था असते. ज्यामुळे या उपचारानंतर त्वचा आपोआप पूर्ववत होण्यास मदत होते. परंतु डोळ्याच्या त्वचेवर जर मोठ्या प्रमाणावर कोलेस्ट्रॉल जमा झालं असेल तर हा उपचार करत नाहीत.

३) फ्रीज थेरपी – त्वचेवरील डाग कमी करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. अतिशय सुरक्षित आणि वेदनामुक्त उपचार म्हणून याकडे पाहिले जाते. मात्र हे उपचार तज्ञ्जांच्या सल्लानेच करा. कारण काही वेळा हायपो पिंगमेंटेशनमुळे त्वचेच्या रंगामध्ये उपचारानंतर बदल होतात.

४) ऑपरेशन – डोळ्याजवळील कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी शस्त्रक्रिया वा ऑपरेशन करता येते. यामुळे डोळ्याजवळ जमा झालेले कोलेस्ट्रॉल निघून जाते. पण, ऑपरेशनचे मार्क्स त्वचेवर राहू शकतात. याशिवाय डोळ्याजवळील त्वचेचा आणि पर्यायाने चेहऱ्याचा आकार बदलू शकतो.

५) गोळ्या औषधे – वरील कोणतीही उपचार पद्धती तुम्हाला सोयीस्कर वाटत नसेल तर डॉक्टर फक्त गोळ्या – औषधे घेऊन ही समस्या बरी करण्याचा सल्ला देतात. मात्र यामुळे कोलेस्ट्रॉल घालण्यासाठी खूप वेळ लागतो. शिवाय सतत गोळ्या औषधे घेतल्याने त्याचा शरीरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता वाढते.