| | |

अपूर्ण झोपेमुळे डोळ्यांना सूज येत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा तुम्ही पाहिले असेल कि रात्री उशिरा झोपलात किंवा मग सकाळी लवकर उठला कि तुमचे डोळे थोडे सुजल्यासारखे दिसतात. याशिवाय अचानक झोपेतून उठलात, नेहमीपेक्षा कमी झोप घेतलात आणि खूप दमलेले असाल तर तुमचे डोळे नक्कीच सुजल्यासारखे दिसत असतील. जर असे होत नसेल तर चांगली गोष्ट आहे. पण असे होत असेल तर घाबरण्याची गरज नाही. कारण हि बाब अतिशय सामान्य आहे. अनेक वेळा डोळ्यांखाली आणि पापण्यांना सूज येते. परिणामी आपला चेहेरा जड आणि वेगळा दिसतो. खरतर या गोष्टीमागे देखील अनेक कारणे आहेत. जसे की झोप न लागणे, तणाव किंवा मग एलर्जी. यातील एलर्जी गंभीर स्वरूपाचा त्रास देऊ शकते. शिवाय आहारात जास्त मीठ खाणे, गरजेपेक्षा कमी पाणी पिणे आणि सतत डोळे चोळणे यामुळेदेखील ही समस्या उद्भवते. त्यामुळे जर तुम्हीही डोळ्यांना सूज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला जे घरगुती उपाय सांगणार आहोत ते एकदा करून पहा. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) बर्फ – कोणत्याही कारणामुळे डोळ्यांना वा डोळ्याच्या पापण्यांना सूज आल्याचे निदर्शनास आले तर यावर बर्फाच्या तुकडयाने हळुवार मसाज करणे फायदेशीर आहे. यासाठी सुती कपड्यात बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि हलक्या हाताने आपल्या डोळ्यांना मसाज करा. यामुळे सूज लगेच कमी होण्यास मदत होईल आणि आराम मिळेल.

२) टी बँग – जर तुम्हाला ग्रीन टी किंवा टी बँग वापरुन चहा पिण्याची सवय असेल तर चहा प्यायल्यानंतर चहाची पिशवी फेकून देऊ नका. कारण हि टी बॅग तुमच्या डोळ्यांवर आलेली सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. चहाच्या पिशवीत अँटि ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे सूज कमी करण्यासाठी तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. रस्ताही तुम्ही वापरलेली चहाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवा आणि रात्री झोपताना १५ मिनिटे डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांवर आलेली सूज उतरेल आणि आराम मिळेल.

३) दूध – कोणत्याही कारणामुळे डोळ्यांच्या खाली सूज किंवा डोळ्याच्या पापण्यांमध्ये फुगीरपणा जाणवल्यास तो दूर करण्यासाठी दुधाचा वापर करता येईल. यासाठी १ वाटी दुधात कापसाचे गोळे भिजवून हि वाटी फ्रीजमध्ये ठेवा. आता थंड झालेले हे गोळे काही वेळ डोळे बंद करून डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांवरील सूज काही वेळातच दूर होईल.

४) चमचा – डोळ्यांवरील सूज कमी करण्यासाठी ४ – ५ चमचे घ्या. हे चमचे १० मिनिट फ्रीजरमध्ये ठेवा. आता थंड चमचे विरुद्ध बाजूने डोळ्यांवर लावा. यामुळे डोळ्यांवर आलेली सूज कमी होईल.