HomeMade Hair Oil
| |

प्रदूषणाने झाले केस बेहाल..? तर ‘हे’ घरगुती तेल अवश्य वापरा; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल धूळ, माती आणि प्रदूषणाची समस्या इतकी मोठी झाली आहे कि बस्स.. शरीरासोबत, सौंदर्याची काळजी घेऊनही प्रदूषणामुळे लोक त्रस्त आहेत. सुंदर, लांबसडक आणि चमकदार केस स्त्रियांच्या सौंदर्याची उजवी बाजू असतात. मात्र चुकीची जीवनशैली आणि प्रदूषणामुळे केसांचे रुष्क होणे, निर्जीव होणे तसेच केसांचे गळणे, अकाली पांढरे होणे अशा समस्या उदभवू लागल्या आहेत. त्यात वाढत्या कामाचा ताण आणि वेळेची कमतरता यामुळे केसांकडे लक्ष देणे जमत नाही. परिणामी हळूहळू केसांची घनता कमी होते आणि अनेकदा टक्कल देखील पडण्याची शक्यता असते.

अशा प्रत्येक समस्येवर महागड्या ब्युटी ट्रीटमेंट करणं प्रत्येकाच्या खिश्याला परवडत नाही. म्हणूनच आज आम्ही केसांचे आरोग्य सुव्यवस्थित करणारे नैसर्गिक तेल घरगुती पद्धतीने कसे बनवायचे आणि कसे वापरायचे ते सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही केसांच्या समस्यांनी हैराण झाले असाल तर हा लेख पूर्ण जरूर वाचा.

० तेल बनविण्यासाठी लागणारे साहित्य –
५०० मिली नारळ तेल (लाकडी घाण्याचे), २ टेबलस्पून कडुलिंबाची पाने (वाळलेली), २ टेबलस्पून कढीपत्त्याची पाने (वाळलेल्या), १ टेबलस्पून आवळा पावडर, २ टीस्पून काळे तीळ, १/२ टीस्पून मेथीदाणे पावडर, २ टेबलस्पून एरंडेल तेल

० तेल बनवण्याची कृती
एका लोखंडी कढईत नारळाचे तेल, आवळा पावडर, मेथीदाणा पावडर, कढीपत्ता, कडुलिंबाची पाने आणि काळे तीळ साधारण ५ मिनिटे गरम करा. या मिश्रणाचा रंग काळा झाल्यास गॅस बंद करा. आता रात्रभर हे मिश्रण असेच ठेवून द्या. यानंतर सकाळी हे मिश्रण गाळून त्यात एरंडेल तेल घालून हवाबंद बाटलीमध्ये साठवून ठेवा.

० टिप –
तेल लावण्यापूर्वी थोडे गरम करा. मालिश करा आणि काही तास तसेच ठेवा. यानंतर सौम्य शैम्पूने केस स्वच्छ धुवा.

० फायदे –

- या घरगुती तेलातील प्रत्येक घटक हा नैसर्गिक असल्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी हे तेल लाभदायी आहे. 

- शिवाय या तेलामुळे केस मुळापासून मजबूत होतात. 
- तसेच अकाली केस पांढरे होण्याची समस्या दूर होते. 

- केसांमधील निर्जीवपण राकटपणा दूर होतो आणि केस मऊ तसेच नैसर्गिकरित्या     चमकदार दिसतात.