| |

दररोज रात्री चेहऱ्याला कच्चे दूध लावालं तर त्वचा राहील सॉफ्ट सॉफ्ट; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेतील आद्रता हळू हळू कमी होते आणि परिणामी आपली त्वचा अगदी कोरडी तसेच निस्तेज वाटू लागते. म्हणूनच या दिवसात प्रामुख्याने आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. खरंतर ऋतूनुसार सर्वकाही बदलते. जसे कि वातावरण आणि अगदी आहारसुद्धा. हिवाळ्याच्या हंगामात वातावरणात काही विशिष्ट बदल होत असतात. ज्यामुळे वातावरणातील ओलावा कमी होते. याचा परिणाम थेट आपल्या शरीराच्या आणि त्वचेच्या आरोग्यावर होत असतो. अनेकदा यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. याशिवाय त्वचा कोरडी पडल्यामुळे त्वचेला खाज सुटते. शिवाय त्वचेचे पापुद्रे निघणे आणि जखमा होणे या समस्या उदभवतात. या समस्या हिवाळ्याच्या दिवसात भले सामान्य असतील पण त्रासदायक असतात. यावर उपाय म्हणून कच्चे दूध १००% प्रभावी उपाय आहे.

कच्च्या दुधात ब जीवनसत्त्व, कॅल्शियम, अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. यामुळे दररोज चेहऱ्यासाठी कच्चे दूध वापरले असता हिवाळ्यातही आपली त्वचा तेजस्वी, नितळ आणि एकदम कोमल राहण्यास मदत होते. यासाठी काय कराल जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० कोमल त्वचेसाठी कच्चे दूध कसे वापरावे?
– यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त कच्चे दूध लागणार आहे.
– साधारण ४ ते ५ चमचे दूध घ्या. आता दररोज रात्री झोपण्याअगोदर आपल्या संपूर्ण चेहऱ्याला कापसाच्या बोळाच्या सहाय्याने दूध लावा. दूध चेहऱ्याला लावल्यानंतर थेट सकाळीच आपला चेहरा धुवा.

० फायदे –

१) कच्चे दूध आपल्या चेहऱ्याला मऊ करण्याचे काम करते. यामुळे आपला चेहरा तजेलदार राहतो.

२) कच्चे दूध आपल्या त्वचेतील डेड सेल्स नष्ट करते. परिणामी चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते.

३) कच्च्या दुधातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला आतून स्वच्छ करतो. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेतील बारीक छिद्रांमध्ये अडकलेली घाण निघून जाण्यास मदत होते.

४) कच्चे दूध त्वचेच्या सर्वात शेवटच्या थरापर्यंत काम करते. यामुळे त्वचेला आवश्यक पोषण अगदी शेवटच्या थरापर्यंत मिळते. परिणामी त्वचा तेजस्वी होते आणि लक्षवेधी ठरते.

५) आपल्याला मुरुमांची समस्या त्रास देत असल्यास यावरही कच्चे दूध अत्यंत प्रभावीरीत्या काम करते आणि हे डाग हळू हळू कमी करते.

६) कच्चे दूध हे काळे डाग आणि पॅच साफ करण्यास मदत करते. टॅनिंग, मुरुमांवर उपचार करते आणि सुरकुत्या, त्वचेचे नुकसान आणि बारीक रेषासुद्धा कमी करते.

० लक्षात ठेवा
– आपल्या त्वचेला दूध लावताना दूध कच्चे असेल याची काळजी घ्या.
– चेहऱ्याला दूध लावताना एकतर हलक्या हाताने गोलाकार हालचालीत कच्चे दूध लावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ करा किंवा दूध लावण्यासाठी कापसाच्या बोळ्याचा वापर करा.