| | |

आहारात झिंकचे प्रमाण योग्य असेल, तर सर्दी- खोकल्याची चिंता मिटेल; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन आहारात आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक पोषक तत्त्वांची आवश्यकता पूर्ण होणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने ज्या लोकांना सतत सर्दी, खोकला, ताप आणि डोकेदुखीचा त्रास जाणवतो अश्या लोकांनी आहारात झिंकचे प्रमाण संतुलित ठेवणे गरजेचे आहे. याचे कारण असे कि तज्ञ सांगतात, सर्दी-खोकला आणि त्याची लक्षणे कमी करण्यासाठी शरीरात झिंकचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे.

० झिंक म्हणजे काय?
– झिंक हे एक असे पोषक तत्व आहे ज्याची शरीरात अनेक कार्य करण्यासाठी मदत होते. हे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास, पचन सुधारण्यास आणि जळजळ टाळण्यास मदत करते. तसेच मांस, शेलफिश आणि चीजमध्ये झिंक मोठ्या प्रमाणात आढळते.

– एका संशोधनात, ५५०० लोकांवर झिंकच्या २८ चाचण्या केल्या असता यात असे आढळून आले कि, सर्दी आणि खोकल्याचा त्रास असलेल्या रुग्णांना तोंडावाटे वा नाकाने झिंक दिल्यानंतर त्यांची प्रकृती अगदी २ दिवसांत सुधारली. त्याचवेळी, ज्या रुग्णांना झिंक दिले नाही, त्यांच्यामध्ये ७व्या दिवसापर्यंत कोणतीही सुधारणा दिसली नाही.

– यानंतर संशोधकांच्या निष्कर्षानुसार, सर्दी खोकला अत्यंत तीव्र पातळीवर पोहोचला असेल तर झिंकमुळे दररोज लक्षणे कमी होत नाहीत. परंतु तिसऱ्या दिवसापासून त्याचा परिणाम दिसून येतो.

– या संशोधनानुसार, संशोधकांनी असा दावा केला आहे कि, कोणत्याही रुग्णावर झिंकचे दुष्परिणाम आढळले नाही. त्यामुळे ज्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो, त्यांनी प्रभावी उपचार म्हणून झिंक चांगले आहे.

० शरीरात झिंकची कमतरता असल्यास खालील पदार्थांचा आहारात समावेश करा:-

१) दुग्धजन्य पदार्थ – शरीरातील झिंकची कमतरता भरून काढायची असेल तर आहारात दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण वाढवा. दरम्यान झिंकची कमतरता दूध, चीज, दही याने पूर्ण होऊ शकते. यामुळे आहारात प्रामुख्याने दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

२) अंडी – अंड्यामध्ये ५ टक्के झिंक समाविष्ट असते. यामुळे रोजच्या आहारात जर अंड्यांचा समावेश केला तर शरीरातील झिंकची कमतरता पूर्ण होते. शिवाय अंडी खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि खराब झालेले स्नायू दुरुस्त होणाया मदत मिळते.

३) मासे – माश्यांमध्ये झिंक, प्रथिने याव्यतिरिक्त अनेक पोषक तत्वे चांगल्या प्रमाणात समाविष्ट असतात. यामुळे आठवड्यातून किमान दोनदा मासे खाल्ल्यात त्यातून चांगल्या प्रमाणात झिंक शरीरात शोषून घेतले जाऊ शकते. यातील झिंक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

४) डार्क चॉकलेट – डार्क चॉकलेट केवळ झिंकची कमतरताच नव्हे तर मासिक पाळीच्या दुखण्यापासूनदेखील आराम देते. शिवाय डार्क चॉकलेट खाल्ल्यास चयापचय सुधारते आणि मनःस्थिती प्रसन्न राहते.

५) टरबूजाच्या बिया – टरबूजाच्या बियांमध्ये झिंक आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे दैनंदिन जीवनात टरबूजाच्या बिया सुकवून खा. याशिवाय त्या बारीक करून जेवणात घालूनदेखील खाता येईल.