If the baby in the house is crawling, don't put these things in front of him by mistake

घरातील लहान बाळ रांगायला लागले असेल तर ‘या’ वस्तू मात्र चुकून सुद्धा ठेवू नका त्याच्यासमोर

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  मुल लहान म्हंटल की , त्याची काळजी ही अतोनात करावीच लागते. त्याच्या समोर एखादी जरी वस्तू चुकून आली तर ते बाळ लगेच आपल्या तोंडात टाकायला सुरुवात करते. काही वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केले असता,  नकळत बाळाला इजा झालेल्या आपण ऐकल्या असतील किंवा पाहिल्या पण असतील.  एखाद्यावेळी झालेला निष्काळजीपणा हा बाळाच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे नेहमी अलर्ट राहून बाळाकडे लक्ष दिले गेले पाहिजे.कोणत्या वस्तू बाळाच्या समोर नसल्या पाहिजेत याची माहिती घेऊया…

जास्त आवाज असलेली खेळणी—

अनेक बालरोगतज्ज्ञ याच्या सल्ल्यानुसार बाळाला नेहमी जास्त आवाज असलेली खेळणी त्रासदायक ठरतात. त्याचा आवाज हा कानांवर पडून त्यांना इजा होऊ शकते.

हलणारी खेळणी—

जाणकार लोकांच्या मते, जे काही हलणारे फर्निचर आहे त्याचा वापर हा घरात ठेवू नये. कारण मुले ही खूप मस्तीखोर असतात. अश्या वेळी त्यांना इजा होण्याची शक्यता गी जास्त असते.

धारदार वस्तू—

अनेक वेळा आपण वापरलेली वस्तू ही त्या जागी ठेवणे विसरतो. अश्या वेळी जरी चुकून लहान मुलांचा हात लागला तर मात्र मोठे काहीतरी घडू शकते. त्यामुळे अश्या वस्तू दूर ठेवणेच आवश्यक असते.

पॉवर प्लग—

जर लहान मुलांचा स्पर्श हा जर पॉवर किंवा इलेक्टिकल वस्तूंना लागला तर मोठा धोका हा निर्माण होऊ शकतो.