If the baby is sweating in his sleep

बाळाला जर झोपेत घाम येत असेल तर ….

हॅलो आरोग्य  ऑनलाईन । लहान बाळाची खूप काळजी घ्यावी लागते. बाळ जर अतिशय लहान असेल तर अश्या वेळी बाळाच्या झोपण्यापासून त्याच्या आहारातील प्रत्येक घटकांची काळजी खूप चांगल्या पद्धतीने करावी लागते. लहान बाळाला जर साधा ताप जरी आला तरी ते त्याला सांगता येत नाही . त्यामुळे त्याला होणारा त्रास हा घरातली व्यक्तींना समजणे खूप महत्वाचे आहे. रात्रीच्या वेळी जर बाळाची झोप योग्य रीतीने झाली नाही तर बाळाची चिडचिड खूप होते ते इतर वेळी मग आईला त्रास देण्यास सुरुवात करते. पण त्याची झोप पूर्ण न होण्याची नेमकी कारणे काय आहेत ? ती शोधून काढणे गरजेचे आहे. बाळाला रात्रीच्या वेळी घाम आल्यामुळे सुद्धा त्याची झोप हि पूर्ण होत नाही. पण त्याला घाम का आला जातो? बाळाला रात्रीच्या वेळी झोपेत घाम येण्याचे कारणे खालील प्रमाणे आहेत ….

हालचाल —-

बाळ रात्रीच्या वेळी अजिबात हालचाल करत नाही.बाळाच्या सोबत जर इतर मोठी व्यक्ती झोपत असेल तर त्यामुळे बाळ अजिबात हालचाल करत नाही. त्यामुळे सुद्धा बाळाला रात्रीच्या वेळी जास्त घाम येतो. जर बाळाचे रात्रीच्या वेळी हालचाल झाली नाही. तर त्याच्या शरीराचे तापमान हे जास्त वाढते. आणि ते तापमान कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी लहान मुलांना घाम येते.

खोलीचे तापमान —

जर खोलीचे तापमान जर वाढत चालले तरी सुद्धा बाळाला जास्त घाम येतो. उन्हाळयाच्या दिवसांत खोलीचे तापमान योग्य प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे . त्यासाठी पंखा किंवा एसी चा वापर करणे आवश्यक आहे .

पांघरून —-

बाळाची काळजी म्हणून अनेक वेळा त्याच्या अंगावर पांघरून घातले जाते. जर अगोदरच वातावरणामध्ये उष्णता जास्त असेल तर त्याला पांघरून घालणे चुकीचे आहे . त्यावेळी बाळाला घाम हा जास्त येतो.

आरोग्याच्या समस्या —-

जर बाळाला आरोग्याच्या समस्या या जास्त असतील तर त्यावेळी सुद्धा काही प्रमाणात औषध घेत असाल तर बाळाला घामाच्या समस्या या जाणवतात.

जन्मजात हृदयरोग —-

जर बाळाला हृदयाचा कोणताही त्रास असेल तर त्याला त्याच्या दररोज च्या जीवनात खूप जास्त प्रमाणात घाम हा येतो. हृदयाच्या आजारासाठी बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे .