| | |

दररोज खालं पिस्त्याचा गर तर, शारीरिक ऊर्जेत पडेल भर; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो ड्रायफ्रूट्स खायला सगळ्यांनाच आवडतात. पण अनेकांच्या खिशाला मात्र ते परवडत नाहीत. जस कि पिस्ता. ड्रायफ्रुटसमधील सगळ्यात महागडा प्रकार म्हणजे पिस्ता. क्रीम कलरच्या टणक आवरणात असलेला हिरव्या रंगाचा पिस्ता हा अतिशय महागड्या ड्रायफ्रूटपैकी एक आणि आरोग्यासाठी उत्तम असा प्रकार आहे. अनेक लोक खारा पिस्ता खाणे पसंत करतात. पण मित्रांनो पिस्त्याचे टणक आवरण फोडून हिरव्या पिस्त्याचा गर खाण्यात जी मजा आहे ती मजा खाऱ्या पिस्त्यात कुठे. पिस्त्याचा वापर विविध प्रकारांमध्ये केला जातो. पण बहुतांशी घरात पिस्ता वगळतात. याचे कारण त्याची किंमत हि फारशी परवडणारी नसते. पण मित्रांनो कधीतरी थोडासा खर्च चालतो ना. शिवाय बाजारात अगदी माफक दरातील छोटे मोठे पिस्त्याचे पाकीट मिळते. तुम्ही तेसुद्धा वापरू शकता. आता तुम्ही म्हणाल कि एवढा अट्टाहास कशाला? तर आम्ही सांगू कि पिस्ता खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असते. म्हणून हा अट्टाहास!

० पिस्ता शरीरासाठी चांगला आहे म्हणजे पिस्त्यामध्ये असे आहे तरी काय?
– पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 3, प्रोटिन, फायबर, अँटिऑक्सिडंट आणि पोटॅशिअम याशिवाय अनेक अशी पोषण मूल्य असतात जी शरीरासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पिस्त्याचे सेवन हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. चला तर जास्त वेळ न घालवता आपण पिस्त्याचे फायदे जाणून घेऊयात:-

१) शारीरिक ऊर्जेत भर – आपल्या शरीराला कोठेही काम कारण्यासाठी आवश्यक असलेली उर्जा पिस्तामधून मिळते. कारण पिस्त्यामध्ये असणारे व्हिटॅमिन, मिनरल्स, कार्बोहायड्रेटस, फॅट, प्रोटिन,फायबर, कॅल्शिअम, झिंक हे घटक उर्जावर्धक असतात. ज्यामुळे अगदी ४-५ पिस्ता खाल्ल्यानेसुद्धा संपूर्ण दिवसभर उत्साही वाटते

२) रोग प्रतिकार शक्तीत वाढ – कोणत्याही आजारांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करायचे असेल तर यासाठी आधी तुमची रोग प्रतिकार शक्ती मजबूत हवी. यासाठी पिस्ता खाणे फायद्याचे ठरते. कारण पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन B6 असते जे रोग प्रतिकार शक्ती वाढवते.

३) संसर्गापासून संरक्षण – पिस्त्यामध्ये असणारे व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन C हे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. परिणामी कोणत्याही संसर्गापासून हमखास आरोग्याचे रक्षण होते. शिवाय रोग प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे कोणत्याही आजारापासून आपण दूर राहू शकतो.

४) रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये वाढ – आपल्या रक्तामध्ये असणाऱ्या हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अनेक आजार होण्याची शक्यता असते. हिमोग्लोबिन हे एक प्रकारचे मेटालप्रोटिन आहे. ज्यात लोह असते आणि ते शरीरातील प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते. पिस्त्याच्या सेवनामुळे शरीरातील ऑक्सिजन वाढते आणि हिमोग्लोबिन वाढायला होते.

५) मधुमेहावर नियंत्रण – पिस्ता हा मधुमेहासाठी उत्तम उपाय आहे. कारण पिस्ता रक्तातील अतिरिक्त साखर कमी करतो. परिणामी साखर नियंत्रणात राहते आणि तुमचे मधुमेह कंट्रोलमध्ये येतो. शिवाय पिस्त्यामध्ये असलेले फायबर मधुमेहींसाठी लाभदायक असतो.

६) ह्रदयविकारापासून सुटका – कोलेस्ट्रॉलमूळे ह्रदयविकारांची शक्यता वाढते आणि हे कोलेस्ट्रॉल पिस्ता खाल्ल्यामुळे कमी होते. परिणामी हृदयाचे कोणत्याही विकारांपासून संरक्षण होते.

७) पचनशक्तीत सुधार – मुठभर पिस्ता खाल्ल्याने अपचनाच्या तक्रारी दूर होतात. कारण पिस्ता पोटातील अपायकारक बॅक्टेरिया मारतो. परिणामी पचनशक्ती सुधारते. तसेच पिस्तामध्ये असलेले व्हिटॅमिन B6, कॉपर, मॅगनीझ, फॉस्फरस, फायबर पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. कारण पिस्तामधील फायबर विष्ठा शरीराबाहेर टाकण्यास मदत करतात.

८) डोळ्यांचे आरोग्य सुधारते – पिस्त्यातीळ ल्युटेन आणि झेक्झानथिन हे दोन मुख्य घटक डोळ्यांना होणाऱ्या विकारापासून दूर ठेवतात. शिवाय वयपरत्वे होणारा दृष्टिदोषाचा त्रासही पिस्त्याच्या सेवनामुळे कमी होतो.

९) वाढत्या वजनावर नियंत्रण – पिस्त्याच्या सेवनामुळे पोट लवकर भरते आणि यामुळे इतर पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. परिणामी वजन नियंत्रणात राहते.

१०) त्वचेसाठी लाभदायी – पिस्तामध्ये भरपूर व्हिटॅमिन E असते. जे त्वचेसाठी आवश्यक असलेले फॅट पुरवते. त्यामुळे त्वचा तजेलदार राहते. शिवाय त्वचेच्या तक्रारी कमी होतात. मुख्य म्हणजे पिस्ता खाल्ल्याने सूर्यांच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.