| |

उन्हामुळे चेहरा काळवंडला तर हे फेसपॅक देतील उजळपणा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुंदर आणि नितळ त्वचा हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेकांना ते सध्या होते तर अनेकांची नाराजी होते. सुंदर त्वचेसाठी खूप काही करावे लागते असा एक भ्रम आहे. भ्रम म्हणण्याचे कारण असे कि सुंदर त्वचेसाठी खूप काही करावे लागतच नाही. होय. तुम्ही बरोबर वाचताय. खरतर सुंदर त्वचा म्हणजे नुसते पांढरे दिसणे नव्हे तर चेहरा नैसर्गिकरित्या उजळणे, तेजस्वी दिसणे आणि चेहरा डाग विरहित असणे म्हणजे सुंदर दिसणे होय. यासाठी अनेक मोठमोठ्या ट्रीटमेंटची गरज नसते. काही असं उपाय आहेत जे सोप्पे आहेतच शिवाय घरच्या घरी करता येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अश्या फेसपॅक बद्दल सांगणार आहोत जे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. चला तर जाणून घेऊयात:-

१) दही – बेसन
– बेसन आणि दही यांचा फेसपॅक बनविण्यासाठी ३ चमचे दही घ्या आणि यात १ बेसन मिसळून ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा. तसेच ही पेस्ट १/२ तास आपल्या चेहर्‍यावर तशीच राहू द्या आणि सुकल्यानंतर हात ओले करून १० मिनिटे चेहरा मालिश करा. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहरा उजळ आणि तेजस्वी बनेल.

२) दही – हळद
– यासाठी १ वाटी दह्यात १/२ चमचा हळद घाला आणि ही पेस्ट चेहर्‍यावर, गळ्यावर लावा. पुढे ही पेस्ट सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्या. दररोज ही पेस्ट वापरल्यास त्वचा पूर्णपणे स्वच्छ आणि उजळ होईल.

३) लिंबू – कोरफड
– कोरफडीच्या गरात लिंबाचा रस घालून त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हि पेस्ट चांगल्या प्रकारे वाळपवार थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. ही पेस्ट लावल्यास आपल्या त्वचेवरील काळेपणा दूर होईल आणि आपली त्वचा सुंदर व मऊ होईल.

४) लिंबू – मध
– यासाठी लिंबाच्या रसामध्ये थोडे मध घाला आणि नंतर आपल्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर हे मिश्रण लावा. हा उपाय आपण थोडेच दिवस करायचा आहे. कारण यामुळे लवकर त्वचेचा काळेपणा दूर होतो.

५) लिंबू – गुलाब पाणी
– लिंबाच्या रसात १ चमचा गुलाब पाणी घाला आणि ही पेस्ट चेहर्‍यावर, गळ्यावर लावा. यानंतर १/२ तासानंतर चेहरा स्वच्छ करून घ्या. साधारण १ आठवडाभर हा प्रयोग केल्यास शरीराचा काळेपणा दूर होतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *