| |

तापामुळे जिभेला कडवटपणा आला असेल तर ‘हे’ उपाय करा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असे होते कि ताप येऊन गेल्यानंतर आपले तोंड कडू किंवा जिभेला एक कडवटपणा जाणवतो. ज्यामुळे आपण खात असलेल्या पदार्थांची मूळ चव आपल्याला समजत नाही. याउलट आपण खाल्लेले पदार्थ आपल्या चवीला कडूच लागतात. यामुळे काहीही खायची इच्छा होत नाही. खरंतर, तापामुळे वा कोणत्याही आजारामुळे सतत औषधे घेतल्यामुळे असा अनुभव येतो. कारण औषधांमुळे जिभेला कडवटपणा येतो आणि पदार्थांची चव कळत नाही. महत्वाचे म्हणजे इतर आजारांपेक्षा हा अनुभव ताप आल्यावर जास्त येतो. कितीतरी वेळा अगदी पाण्याची चवसुद्धा अगदीच कडवट लागते. त्यामुळे अश्यावेळी न चुकता आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. अन्यथा या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो.

अनेकदा साधारण ताप असला किंवा तापाची तीव्रता कमी असली कि आपण घरगुती उपाय करतो. या तापामुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम रेट कमी जास्त होतो आणि मेटाबॉलिजम व्यवस्थित कार्य करीत नाही. परिणामी आपल्या तोंडाची चव बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असं काही सोप्पे उपाय घेऊन आलो आहोत जे जाणून घ्याल आणि वापराल तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

१) लिंबू पाणी – लिंबू पाण्यामुळे तोंडाला चव येते. फक्त साखरऐवजी मध मिसळून प्या. याचा अधिक लाभ मिळतो. लिंबू पाण्यात विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीराला प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत मिळते आणि परिणामी मेटाबॉलिजम वाढते. मात्र दिवसातून फक्त १ ग्लासच लिंबू पाणी प्या. त्यापेक्षा अधिक पिऊ नका. या गोष्टीची काळजी घ्या.

२) शहाळ्याचे पाणी – तापामुळे तोंड कडू झाले असेल तर उपाशीपोटी शहाळ्याचे पाणी पिणे लाभदायक ठरते. यामध्ये विटामिन्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबरचे चांगले प्रमाण असते. त्यामुळे आजार कोणताही असला तरी शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम. शहाळ्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. शिवाय तापात शरीरातील उर्जा वाढविण्यासाठी हे पाणी मदत करते.

३) पुदीनाची चटणी – तापानंतर जिभेचा कडवटपणा घालवण्यासाठी पुदिनाची चटणी चाखावी. कारण पुदिन्याची चटणी स्वादिष्ट असते. त्यामुळे तोंडाला चव आणून देण्यासाठी याचा फायदा मिळतो. शिवाय पुदीना औषधी असल्याने त्याचा तोटा होत नाही.

४) नैसर्गिक पदार्थांचे सेवन – तापात किंवा ताप येऊन गेल्यानंतर तोंडाची चव बिघडली म्हणूनच नव्हे तर आरोग्यासाठीही आपण नैसर्गिक पदार्थांचे सेवन करणे अत्यंत लाभदायक आहे. जसे कि, विविध डाळी, हिरव्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये, फळांचा रस.

५) फळे खा – तोंडाची बिघडलेली चव परत मिळवण्यासाठी किवी, सफरचंद यासारख्या फळांचा आपल्या आहारात समावेश करून घ्या. विटामिन सी युक्त फळं अशावेळी आरोग्याची काळजी घेण्यासाठी अधिक सक्षमरित्या कार्यरत असतात. तसंच तोंडाचा स्वाद परत आणण्यासाठी मदत करतात.

० कोणते पदार्थ खाऊ नये?
– तापामुळे तोंडाची चव गेली असेल तर पेरू कधीही खाऊ नये. याशिवाय तळलेले पदार्थ, दुधापासून तयार करण्यात आलेले पदार्थही अश्यावेळी खाऊ नये. कारण हे पदार्थ पचण्यास जड असल्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते.

० अत्यंत महत्वाचे – तापानंतर बराच काळ तोंडाची चव परतली नाही तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय वर दिलेल्या पदार्थांपैकी कोणत्याही पदार्थांची अलर्जी असल्याचं त्याचे सेवन प्रामुख्याने टाळावे.