|

दुखावलेल्या पायाला सूज आली तर ‘हे’ घरगुती उपाय देतील आराम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कधी कधी खूप वेळ चालणे किंवा बराच वेळ उभे राहणे यामुळे पायाला सूज येते. इतकेच काय तर कितीतरी वेद आपण धडपडतो आणि यामुळे पाय मुरगळतो. अश्यावेळी बहुतेकदा पायाला सूज येते. तसे पाहाल तर पाय मुरगळल्यामुळे त्यावर सूज चढणे हि अतिशय सामान्य बाब आहे. परंतु, कोणतेही कठीण काम न करता पायांना सूज येत असेल तर याकडे गंभीरदृष्ट्या पाहणे गरजेचे आहे. कारण, पायाला सूज येणे एखाद्या घातक रोगाचे लक्षण असू शकते. पण बहुतेकदा पाय सुजण्याची कारणे निश्चित असतात जसे कि,
१) पाय मुरगळणे.
२) लांब अंतर पायी चालणे.
३) दीर्घकाळ उभे राहणे.
४) अति व्यायाम करणे किंवा खेळणे.
५) शरीराचे वाढलेले वजन
६) संबंधित रोग – जसे कि, पायातील संक्रमण
७) वाढते वय
८) पायाला जखम, इजा वा मुक्का मार बसणे
९) रक्तदाब वाढणे
१०) महिलांमध्ये गर्भावस्थेच्या समस्या
वरील सर्व कारणांमुळे पायाला सूज येते. पण मुळातच पायाला सूज येणे ही फार मोठी समस्या नाही असे समजून अनेक लोक घरगुती उपाय करतात. म्हणूनच आज आम्ही पायाची सूज कमी करण्यासाठी करावयाचे योग्य घरगुती उपाय सांगणार आहोत. परंतु जर हे उपाय करूनही सूज उतरली नाही तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या.

० उपाय

१) बर्फाचा शेक/आईस बॅग – बर्फ शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करतो. सूज असलेल्या जागी बऱ्याचदा रक्त जमा झालेले असते. हे रक्त बर्फाच्या शेकामुळे मोकळे होऊन सुरळीत वाहू लागते. यामुळे पायाला सूज आली असेल तर सूजलेल्या जागी १०-१२ मिनिटे बर्फाने शेक दिला असता सूज कमी होण्यास मदत होते. यासाठी आईस बॅगचा उपयोग करता येईल वा रुमालात बर्फाचे तुकडे बांधूनदेखील शेकू देता येईल.

२) सेंधव मीठ – सेंधव मिठात मॅग्नेशियम सल्फेट असते. जे स्नायूंचे आकुंचन दूर करते. त्यामुळे पायाला सूज आली तर अर्धा कप मीठ एक बादली वा टबमधील कोमट पाण्यात टाका. यानंतर या कोमट पाण्यात आपले पाय १०-१५ मिनिटे बुडवून बसा. यामुळे सूजसुद्धा कमी होईल आणि ताणही दूर होईल.

३) मालिश – कोणतीही सूजन कमी करण्यासाठी मालिश हि अतिशय जुन्या काळापासून वापरली जाणारी पद्धती आहे. यात प्रामुख्याने मोहरीच्या तेलाने केलेली मालिश पायाची सूज आणि दुखणे कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. यासाठी मोहरीचे तेल हलके गरम करा सूजन असलेल्या जागी हे तेल ५-१० मिनिटे मालिश करून लावा.

४) धणे – पायाला सूज आल्यास ३ मोठे चमचे धणे १ कप पाण्यात उकळा. यानंतर हे पाणी गाळून कोमट झाल्यावर प्या. याशिवाय १ कप पाण्यात रात्रभर धणे बुडवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या आणि धण्यांची पेस्ट बनवून सूज असलेल्या जागी लावा.