|

ओठ काळे पडले असतील तर हे उपाय नक्की करा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन | ओठ काळे होण्याची समस्या बऱ्याच लोकांमध्ये आढळते. याकरिता अनेक वैद्यकीय कारणे आहेत तर आपल्या जीवनशैलीतील बरेच घटक देखील यास कारणीभूत आहेत. धूम्रपान करणे (Smoking), डिहायड्रेशन, जास्त वेळ उन्हात असणे, ओठ चोखणे वा चावण्याची सवय आणि कॅफिन अशी बरीच कारणे आहेत ज्यामुळे ओठ काळे आणि सौंदर्यहीन होऊ शकतात. यामुळे बर्‍याचदा काळे ओठ चारचौघात जातेवेळी मनात न्यूनगंडाची भावना देतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहोत. ज्याचा वापर केला असता ओठांच्या काळेपणा पासून तुमची सुटका होईल.

१) डाळिंब – डाळिंबाच्या अर्कात अर्थात रसामध्ये त्वचेचे हायपरपिंगमेंटेशन हलके करण्याची सक्षमता असते. यासाठी १ मोठा चमचा डाळिंबाचे दाणे आणि ताजी मलई गुलाबाच्या पाण्यात मिसळून त्याची दाटसर पेस्ट बनवा. हा मास्क आपल्या ओठांवर किमान ५ ते १० मिनिटांसाठी लावून ठेवा आणि त्या नंतर थंड पाण्याने ओठ स्वच्छ करा. यातील ताजी मलई मॉईश्चरायझर म्हणून काम करते आणि आपल्या ओठांना मऊ करते. तर डाळिंबाचा अर्क ओठांची चमक देण्यासाठी मदत करतो.

२) कोरफड जेल – ओठाचा काळेपणा आणणाऱ्या मेलोनिन घटकास नैसर्गिक कोरफडीचा गर प्रतिबंधित करतो. याकरिता १ चमचा कोरफडीचा गर घ्या आणि यामध्ये थोडीशी हळद मिसळा व आपल्या ओठांवर ओल्या बोटाने ही पेस्ट चोळा. साधारण १० ते १५ मिनिटांनंतर ती धुवा आणि आपल्या पसंतीचा लीप बाम ओठांना लावून ओठांना ओलावा द्या. यामुळे ओठांची गेलेली चमक परत येते.

३) बदाम – बदामात व्हिटॅमिन ई असते जे काळ्या ओठांवर जालीम उपाय आहे. यासाठी १ चमचा बदाम पावडर ताज्या मलईत मिसळून त्याची पेस्ट बनवून आपल्या ओठांवर किमान ३ ते ५ मिनिटांसाठी लावा. यामुळे आपल्या ओठांवरील नाजूक त्वचेला हायड्रेट करणारे पोषक घटक मिळतात व ओठांची त्वचा सुंदर व चमकदार दिसते. शिवाय ओठांना मॉईश्चराईझ करण्यासाठी दररोज बदाम तेलाचा वापर करा. बदामात आढळणारे अँटीबॅक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आपल्या ओठांना पोषण देतात आणि यामुळे ते हलके व गुलाबी दिसू लागतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *