brain

जर दिवसेंदिवस स्मरणशक्ती कमी होतेय तर….

हॅलो आरोग्य ऑनलाईन।  वयाच्या ठराविक वर्षानंतर मेंदूमध्ये झालेल्या बदलामुळे शरीराला त्रास निर्माण होतो आणि मेंदूच्या समस्या या निर्माण होतात. त्यामुळे त्याचा असर हा स्मरणशक्ती वर होत असतो. मेंदू हा आपल्या अवयव यामधील सर्वात महत्वाचा  भाग आहे. अश्या वेळी मेंदूच्या जर समस्या निर्माण होत असतील तर काय उपाययोजना करणे आवश्यक आहे. ते जाणून घेऊया….

मेंदू हा सर्वात महत्वचा अवयव आहे. मेंदू मुळे आपल्या शरीराचे कार्य हे उत्तम चालू शकते. त्यामुळे मेंदूला चालना देण्यासाठी घरगुती पद्धतीचे व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी एकांतात बसा. आणि आपल्या मेंदूला ज्या गोष्टी आठवत आहेत. त्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करा. आपले डोळे ज्यावेळी बंद असतील त्या वेळी आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे ही अचूक भेटतात.

एकटेच स्वतःशी संवाद साधा—-

ज्यावेळी एकटे असतो.अश्या वेळी एकटेच एकटयाशी बोलण्याचा प्रयत्न करा. जरी लोक वेडे म्हणत असतील तरी सुद्धा असा संवाद नक्की साधण्याचा प्रयत्न करा. त्या वेळी बोलणे आणि कृती या एकाच वेळी पार पडतात. त्यामुळे स्मरणशक्ती वर खूप मोठा प्रभाव होतो.

रक्तदाब तपासा—–

ज्या लोकांना उच्च रक्तदाब याच्या समस्या आहेत. त्या लोकांना स्मरणशक्ती सारख्या समस्या या निर्माण होताना दिसतात. कारण उच्च दाबामुळे आपल्या मेंदूला रक्ताचा पुरवठा हा कमी कमी होत जातो.

गाणी गुणगुणत राहणे—

गाणं गाताना नेहमी आपल्या मेंदूची उजवी बाजू वापरली जाते. यामुळे समस्या याचे निराकरण होते. त्याचा फायदा हा आपल्या मेंदूला हा होतो.

ध्यानधारणा करणे–

दिवसातून एकदा तरी ध्यान करणे फार आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या शरिरावर सकारात्मक परिणाम जाणवायला मदत होते.