If the palm of the hand is going too far ........

तळहाताची साल जर जास्त प्रमाणात जात असेल तर ……..

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  हवामान आणि ऋतू जर बदलत गेले तर त्यावेळी आपल्याला हाताच्या समस्या या जास्त जाणवतात. हवामानातील बदलामुळे त्वचा हि खराब बनत असेल तर त्यावेळी सुद्धा त्वचेवरील साल हि निघण्यास सुरुवात होते . कधी कधी घरगुती पद्धतीने सुद्धा आपल्या हातांवर उपचार करून सालीच्या समस्या या दूर होऊ शकतात . तळहातावरची साल हि निघत असताना आपला तळहात हा खराब दिसतो. तसेच कोणतेतरी मोठे विकार झाले आहेत का ? असा भास पण होतो. त्यावेळी काय करता येऊ शकते . ते जाणून घेऊया …..

—– आपल्या शरीराला पाण्याची सवय हि जास्त लावली गेली पाहिजे . त्यामुळे आपले शरीर हे डिहायड्रेट होणार नाही . पाणी हे पचनास सुद्धा खूप मदत करते. शरीर हे डीऑक्सिडाइज होणार नाही . आणि हातची साल सुद्धा निघणार नाही.

— जर हाताची साल निघत असेल तर मात्र कोरफडीचा वापर हा आपल्या हाताला करावा . म्हणजे तळवे हे स्वच्छ होतील . सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्याच्या मदतीने हात स्वच्छ धुवा .

— केळी हे आपल्या शरीराला मॉइश्चराइज करण्यास मदत करते . केळीच्या मदतीने त्वचा हि अजून सुंदर बनते . तसेच सालीच्या समस्या या दूर होतात.

— हाताच्या सालीवर जर ग्लिसरीन लावले तर त्याचा फायदा हा आपल्याला होऊन नवीन साल येण्यास मदत करते .

— सालीसाठी जर दुधाची साय लावली तर त्याने हात आणि त्वचा हि मुलायम बनते .