If the taste in the mouth is completely gone .....
|

तोंडची चव पूर्णपणे गेली असेल तर …..

हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक वेळा आपण आजारी पडलो तर त्यावेळी कोणतेच पदार्थ हे खाण्याची इच्छा होत नाही. कि कोणते पदार्थ खावेसे पण वाटत नाहीत . पूर्णपणे तोंडाची चव गेली जाते. ज्यावेळी आपल्याला जास्त प्रमाणात ताप आला असेल तर त्यावेळी जिभेवर फोड येतात. आणि कोणताच पदार्थ हा खाल्ला जात नाही . तसेच ज्या लोकांच्या सेवनात दररोज गोळ्यांचे प्रमाण हे जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा तोंडाची चव हि निघून जाते . त्यावेळी काय करता येऊ शकते ते जाणून घेउया ….

तोंडाची चव गेली असेल तर मात्र आहारात गूळ घ्या . गुळामध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त असते . त्यामुळे गूळ खाताना तो जिभेवर ठेवा आणि तसाच विरघळू द्यावा . त्यामुळे तोंडाची चव लगेच येते. हा प्रयोग दिवसातून फक्त दोनदा करावा . गुळामधून आपल्या शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते . आले सुद्धा आपल्या शरीराला आणि जिभेला खूप प्रभावी आहे. आल्याचा तुकडा हा जिभेवर ठेवला तर आल्यातील रसायन हे आपल्या जिभेवर पडून जिभेवरील टेस्ट बुडस सक्रिय होऊन तोंडाला चव येण्यास सुरुवात होते.

जिभेला चव येण्यासाठी आहारात आपल्या आवडीचा पदार्थ हे जबरदस्तीने खा . लसणाच्या पाकळ्यांमध्ये अँटी इंफ्लामेंटरी हे गुण असतात. त्यामुळे लसणाच्या पाकळ्या या चघळा. त्यामुळे सर्दी , खोकला याच्या समस्या दूर होतात. तोंडाला आपोआप चव यायला सुरुवात होते . जिभेला चव येण्यासाठी काकवी आणि भाकरी याचा आहारात समावेश करावा. म्हणजे पूर्वीप्रमाणे जिभेला आणि तोंडाला चव येते. जर अशा समस्या या खूप जास्त निर्माण होत असतील तर त्यावेळी आपल्या आहारात मद्यपान अजिबात ठेवू नका . त्यामुळे जेवढी चव आहे , ती पण निघून जायला सुरुवात होते .