Omicron
| |

अचानक जाणवली ‘ही’ लक्षणे तर ओमिक्रॉनची चाचणी करणे आवश्यक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जगभरात गेली दोन वर्ष हाहाकार माजवलेला विषाणू अर्थात कोरोना विषाणूने आपला कहर अद्याप थांबवलेला नाही. यात भर म्हणून कोरोनाचा नवा व्हेरियंट आता आणखीच हातपाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. B.1.1529 असे वैज्ञानिक नाव असलेल्या या विषाणूला नंतर WHO’ने ‘Omicron’ असे नाव दिले. शिवाय रिसर्च रिपोर्टने सांगितले कि, हा व्हेरयंट कोरोनाच्या डेल्टा व्हेरीयंटपेक्षा फार धोकादायक नसला तरीही त्याला सर्वसामान्य समजण्याची चूक करू नये. शिवाय त्याच्या प्रसाराचा वेग डेल्टा पेक्षा अधिक असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाकारता येत नाही. अशावेळी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने लोकांसाठी महत्वाचे आवाहन केले आहे. यात त्यांनी उल्लेख केलेली लक्षणे आढळ्यास त्वरित ओमिक्रॉनची चाचणी करा असे सांगण्यात आले आहे.

– आरोग्य विभागाने सांगितले कि, तूर्तास ओमिक्रॉनवर आवश्यक संशोधन पूर्ण झालेले नाही. मात्र आतापर्यंत संक्रमित लोकांमध्ये दिसलेली लक्षणे दुर्लक्ष करून चालणार आंही. याची काही लक्षणे कोरोनासारखी आहेत. तर काही पूर्णपणे वेगळी आहेत. त्यामुळे खाली सांगितलेली लक्षणे जाणवली तर ओमिक्रॉनसाठी चाचणी जरूर करून घ्या, असे थेट आवाहनच आरोग्य विभागाने केले आहे. जाणून घ्या लक्षणे खालिलप्रमाणे:-

० सर्वसाधारण फ्ल्यू सारखी लक्षणे
– कोरडा खोकला
– घसा उकलणे
– चक्कर येणे
– सर्दी होणे
– नाक वाहणे
– शारीरिक कमकुवतपणा

० वरील सर्व सामान्य लक्षणांसोबत,
– तीव्र डोकेदुखी
– स्नायूदुखी
– कफ खोकला
– अंगदुखी
– छातीत वेदना याही लक्षणांचा समावेश असेल तर त्वरित चाचणी करून घेणे आवश्यक आहे.