| |

तहान मिटत नाही तर हे घरगुती उपाय जरूर वापरून पहा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले शरीर निरोगी आणि आरोग्य स्वस्थ राहावे असे वाटत असेल तर केवळ खाणे इतकेच गरजेचे नसते. तर आपल्या शरीराला योग्य मात्रेमध्ये पाणी मिळणे देखील आवश्यक असते. बहुतेकदा उन्हाळयाच्या दिवसात आपल्या शरीराचे तापमान अन्य दिवसांपेक्षा अधिक असते. परिणामी शरीर डिहायड्रेट होऊ लागते आणि अन्य आजारांना आमंत्रण दिले जाते. अश्या वेळी प्रामुख्याने उष्माघाताची शक्यता अधिक असते. हे झालं उन्हाळ्यात पण कधी कधी अन्य दिवसांतही आपल्या शरीराला अधिक पाण्याची गरज जाणवते. अशा परिस्थितीत शरीराला पाणी किंवा अन्य द्रव्यरुपी पदार्थांची आवश्यकता असते. जेणे करून शरीरातील वाढलेले तापमान संतुलित करता येईल. त्यात पुन्हा पुन्हा पाणी प्यायल्यावरदेखील तहान मिटत नसेल तर काही घरगुती उपचारांचा वापरही आपण करू शकतो.

शरीराचे वाढते तापमान वेळीच संतुलित करणे अत्यंत गरजेचे असते. नाहीतर पुढे जाऊन अनेको समस्यांना उभारी येतानाचे दिसते. जसे कि, भूक शमन, शारीरिक थकवा, चक्कर येणे, उल्टी होणे, मळमळणे, डोळे दुखणे, तोंड येणे इत्यादी.. म्हणूनच या समस्यांवर वेळीच घाला घालण्यासाठी आपण घरगुती उपचार वापरू शकता. चला तर जाणून घेऊयात शरीरातील पाण्याची कमतरता आणि तहान मिटविण्याचे घरगुती उपचार:-

१) पाण्यात मध घोळून गुळण्या करणे. यामुळे तहान लगेच मिटते.

२) तोंडात लवंग ठेवून चघळणे किंवा तोंडात एका बाजूला ठेवून रस ग्रहण करणे. असे केल्यानेही तहान मिटते आणि बॉडी डिहायड्रेट होत नाही.

३) गायीच्या दुधाचे दही साधारण १२५ ग्रॅम, साखर ६० ग्रॅम, साजूक तूप १० ग्रॅम, मध 3 ग्रॅम आणि काळीमिरपूड, वेलची पूड दोन्ही साधारण ५ ग्रॅम या घ्या. हे सर्व मिश्रण एकत्र करून एखाद्या स्टीलच्या भांड्यात ठेवा आणि त्यामधून थोडं थोडं दही वेळावेळाने खा. यामुळेदेखील तहान मिटते.

४) एक अर्धा लिंबू आणि अर्धा कप पाणी, चिमूटभर मीठ, चिमूटभर साखर हे पेय प्यायल्याने सुद्धा तहान मिटते.

५) जायफळाचा एक लहान तुकडा तोंडात ठेवल्यानेसुद्धा तहान मिटते.

६) साध्या रोजच्या वापरातील तांदळाच्या पेजेत किंवा खिमटीमध्ये मध घालून प्यायल्याने तहान क्षणार्धात मिटते.

७) पिंपळाचे खोड जाळून पाण्यात मिसळा. यानंतर हे पाणी चांगल्या कापडाने गाळून घ्या आणि प्या. असे केल्याने तहान मिटते.

८) जवस आणि सातूचे पीठ पाण्यात घोळून त्यामध्ये थोडे तूप मिसळावे. जे मिश्रण चांगले पातळ करून घ्यावे आणि मग प्यावे. असे केल्याने तहान मिटते.

९) गोड दह्यात गूळ मिसळून खाल्ल्याने जेवल्यावर वारंवार लागणारी तहान कमी होते.

१०) विड्याचे पान खाल्ल्यानेसुद्धा तहान कमी होते. शिवाय घश्याला कोरड पडत नाही.

११) कलिंगड खाल्ल्याने भूक भागते आणि शरीरातील तापमान कमी होते. परिणामी तहान कमी होते आणि पोटसुद्धा देखील बराच काळ भरलेले राहते.

१२) अननसाचा मोरावळा खाल्ल्याने शरीराची जळजळ थांबते आणि हृदयदेखील बळकट होते. शिवाय शरीराचे तापमान संतुलित होऊन पाण्याची कमतरता भरून निघते. परिणामी तहान शमते.