| | |

‘हे’ पदार्थ खालं तर विस्मरणावर मात करालं; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पस्तीशी वा चाळीशी उलटली कि अनेकांना विसरण्याचा त्रास जाणवतो, हे आपण सारेच जाणतो. पण आजकाल अगदी लहान वयातही विस्मरणाचा त्रास संभवतो. खरंतर मेंदूचे कार्य सुरळीत होण्यासाठी शरीर आणि मन निवांत असणं गरजेचं आहे. जे आजकालची जीवनशैली पाहता कठीण आहे. परंतु यामुळे आपण अकाली मृत्यूला स्वतःहूनच आमंत्रण देतोय का काय असे वाटू लागले आहे. त्यामुळे योग्य आहार, नियमित व्यायाम आणि उत्तम जीवनशैलीकडे मार्गस्थ होण्याकडे लक्ष द्या. आपल्या आयुष्यात आपली स्मरणशक्ती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण काही गोष्टी न आठवल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनेकदा आपल्याला का आठवत नाही म्हणून चिडचिड सुद्धा होते. नातेवाईक दुरावतात. माणूस घराबाहेर पडायला सुद्धा घाबरतो आणि हळू हळू एकटा पडतो. अनेकजण नैराश्याकडे ओढले जातात आणि आत्महत्येचे पाऊल उचलतात. त्यामुळे आपली स्मरणशक्ती मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठीच आम्ही तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहोत, ज्यांचे सेवन तुम्ही दैनंदिन जीवनात केलात तर स्मरणशक्ती वाढण्यास नक्कीच मदत होईल. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) बदाम आणि अक्रोड – सुकामेव्यात फॅट्स, अॅंटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई असते. जे आपल्या मेंदूसाठी आवश्यक पोषण देतात. सुका मेव्यातील बदाम, अक्रोड हे मेंदूसाठी खूपच उपयुक्त आहेत. म्हणून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वा मजबूत ठेवण्यासाठी अगदी लहानपणापासून मुलांना बदाम, अक्रोड खाण्याची सवय लावा. तसेच वृद्धांसाठीसुद्धा सुकामेवा फायदेशीर ठरू शकतो.

२) भोपळ्याच्या बिया – भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, लोह आणि कॉपर असते. जे मेंदूवर चांगला परिणाम करते. यातील झिंकमुळे अल्झायमर, नैराश्य यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळते. तर लोह मेंदूच्या पेशींचा विकास आणि मेंदूचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतो. याशिवाय कॉपर मेंदूपर्यंत संदेश पोहचवण्याचे कार्य करतो. परिणामी मेंदूची विचार क्षमता, निर्णय क्षमता आणि स्मरणशक्ती मजबूत राहण्यासाठी मदत होते.

३) व्हिटॅमिन C’युक्त फळे – संत्री, किव्ही, स्टॉबेरी या फळांमध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन C’मुळे मेंदूला चालना मिळते. शिवाय व्हिटॅमिनC रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच वयानुसार होणारी मेंदूंची झीज भरून काढते. याचा चांगला परिणाम स्मरणशक्तीवर होतो.

४) मासे – माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. मेंदूला ६०% फॅट्सची आवशक्ता असते. यापैकी अर्धे फॅट्स हे ओमॅगा ३ फॅटी अॅसिड प्रकारचे असतात. यामुळे मेंदूचा आणि त्यातील विविध पेशींचा विकास होतो. परिणामी स्मरणमशक्ती मजबूत राहते. तसेच चेतासंस्थादेखील सक्रिय राहते. तसेच या फॅटी अॅसिडमूळे अल्झायमर वा नैराश्यासारख्या आजारात मदत होते.

५) ऑलिव्ह ऑईल – आहारात ऑलिव्ह ऑईल असेल तर स्मरणशक्ती मजबूत राहते. कारण या तेलामध्ये अॅंटि ऑक्सिडंट आणि अॅंटि इनफ्लेमॅटरी घटक समाविष्ट असतात. याचा ह्रदय आणि मेंदूवर चांगला परिणाम होतो. परिणामी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी मदत होते.