Eating
| | |

महिलांनी ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास अनेक आजार राहतील दूर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। घरातील प्रत्येकाच्या आरोग्याची काटेकोरपणे काळजी घेणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या आरोग्याबाबत अतिशय निष्काळजी असतात. आपल्या मुलांना न्हाऊ म्हाखू करताना आपल्या शरीराला आवश्यक आहार देणे जणू त्या विसरूनच जातात. दरम्यान स्त्रिया विविध आजारांना बळी जातात. चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे आधीच आरोग्यविषयक तक्रारी वाढताना दिसत आहेत. त्यात शरीराला पुरेसा आराम न मिळाल्यामुळे स्त्रियांना अनेक आजार होण्याची शक्यता बळावते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांना विविध आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतोय. महिलांना आहारातील वैचित्र्यामुळे विविध गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढला आहे. त्यामुळे त्यांनी आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. तर यासाठी महिलांनी आहारात काय खावे ते जाणून घेऊ.

उत्तम आरोग्यासाठी स्त्रियांनी ‘हे’ पदार्थ खावे

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ –

स्त्रियांना ऑस्टियोपोरोसिस आणि संधिवातसारख्या इतर समस्यांचा धोका टाळण्यासाठी दररोज दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. कारण या पदार्थांमधून कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी-12 आणि रिबोफ्लेविन मिळते. जे हाडे, दात आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

शिवाय दह्यातील ‘प्रोबायोटिक्स’ अन्नपचन करण्यास मदत करते आणि शरीरातील जळजळ कमी करून रोज प्रतिकारशक्तीदेखील वाढवते.

हिरव्या पालेभाज्या –

हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर लोह आणि जीवनसत्त्वे असतात. यामध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-के, व्हिटॅमिन-सी आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असते जे तुमच्या हाडांचे आरोग्य राखण्यास मदत करते.

महिलांमध्ये ऍनिमियाची समस्या सामान्य असली तरीही पालक खाल्ल्याने शरीराला अतिशय लाभ होतात.

सुकामेवा –

सुका मेवा खाल्ल्याने जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी चरबी शरीराला मिळते. यामुळे उत्तम हाडांसाठी आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी सुका मेवा फायदेशीर आहे. यात बदामामध्ये मॅग्नेशियम असते तर नट्समध्ये हाडे मजबूत करणारे खनिजे असतात.

DryFruits

याशिवाय अक्रोडमध्ये ओमेगा – 3 फॅट्स असतात. तसेच दररोज मूठभर काजू खाल्ल्याने संपूर्ण आरोग्य सुधारते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *