Sour Curd Use
| | |

दही आंबट झालं म्हणून फेकून देऊ नका, बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असे होते कि आपण दही लावून ठेवतो आणि ते बराच काळ असेच राहते. त्याचा वापरच होत नाही. मग अश्यावेळी दही प्रमाणापेक्षा आंबट होऊ लागते. त्यावर पिवळा मलईचा थर साचू लागतो आणि त्याचा वास तीव्र आंबट तसेच चव झोंबणारी असते. असे दही आरोग्याच्या दृष्टीने खाणे शरीरास बाधा उत्पन्न करणारे ठरू शकते. त्यामुळे कधीच कुणी इतके दही आंबवत नाही. त्यात अनेकांना तर गोड दही खाणेच जास्त आवडते. यामुळे असे आंबट झालेले दही बिनकामाचे समजून फेकून दिले जाते. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि दही आंबट झालं म्हणून फेकून देऊ नका. उलट त्याचा वापर करून उत्तम पौष्टिक आणि चविष्ट असे पदार्थ बनवा. जर तुम्हाला हे पदार्थ कोणते ते माहित नसेल तर लगेच जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

  • इडली/ डोसा – अनेकदा नाश्त्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक डोसे खाणे पसंत केले जाते. तर काय झालं डोसे हा साऊथ इंडियन पदार्थ आहे. भारतात मोठ्या प्रमाणात उडपी पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे या पीठात तुम्ही आंबट दही मिसळू शकता. आता डोसा पिठ बनवण्यापूर्वी तांदूळ पाण्याने धुवून दह्यात मिसळून त्यात मेथीचे ४ ते ५ दाणे मिसळा. यानंतर साधारण ३ तास हे पीठ असेच ठेवून द्या. यानंतर ते बारीक करून त्यात थोडं दही घालून नीट फेटून घ्या. आता मस्त डोसा बनवा. आंबट दही डोस्याचे पिठ आंबट करण्यास मदत करते. शिवाय चवीतही वाढ होते.
आंबवलेले पदार्थ- इडली आणि डोसा
  • चटणी – आता डोसा, इडली म्हटलं तर सोबत आंबट, गोड, तिखट चटकदार चटणी लागतेच. हि चटणी चविष्ट करायची असेल तर काय करालं? अहो सोप्प आहे. घरी आंबलेले दही असेल तर यापासून मस्त चवीची चटणी बनवा. यासाठी लसूण आणि मिरचीची पेस्ट घेऊन त्यात आंबट दही मिसळा. यानंतर चवीनुसार मीठ मिसळा. मात्र लक्षात ठेवा दही खूप पातळ वा घट्ट नको.
चमचमीत खमंग चटण्या
  • ढोकळा – झटपट आणि पौष्टिक नाश्ता म्हणून ढोकळ्याकडे पहिले जाते. अनेकदा स्त्रिया ढोकळा बनवताना वैतागतात कारण, तो ढोकळा फुगत नाही. पण आता ढोकळा फुगीर, मऊ आणि खायला चविष्ट बनवायचा असेल तर फार कष्ट घेण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही फेकून देता ते आंबट दही वापरा. होय. आंबट दही ढोकळ्याची चव आणि पौष्टिकता वाढवते. त्यामुळे ढोकळा पीठ तयार करायचे असेल तर दही आणि बेसन २:१ या प्रमाणात एकत्रित मिसळा. यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला आणि व्यवस्थित एकाच बाजूने फेटून घ्या. आता तयार पिठाचा ढोकळा बनवा.
मऊ लुसलुशीत ढोकळा
  • भटुरे – भटुरेसाठी कणिक मळताना आंबट दह्याचा वापर करा. यामुळे भटूरेचे पीठ व्यवस्थित तयार होईल आणि भटुरा बनला की तो मस्त टमटमीत फुगेल. मुख्य म्हणजे हे पीठ मळताना अर्धी वाटी आंबट दही घ्याल तर भटुरे अगदी बाजारात मिळतात तसे तयार होतील.
लज्जतदार छोले भटुरे

मैत्रिणींनो, आता घरात दही आंबलं तर फेकून देताना हे पदार्थ बनवता येतात हे विसरू नका बरं..! कारण अन्नदाता सुखी भव।