| |

जुलाबाच्या त्रासाने हैराण झालात तर करा हे उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाळी दिवसात काहीही चुकीचं किंवा खराब अन्न खाल्लं कि सगळ्यात मोठी समस्या उदभवते ती म्हणजे जुलाब अर्थात डायरीया. याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. हा त्रास बहुतेकदा तीव्र आणि जीर्ण असतो. सारखे सारखे लॅटरीन लागणे हे डायरीयाचे मुख्य लक्षण आहे. या लक्षणाशिवाय पोटाला मुरडा मारणे, पोटात दुखणे, तापयेणे, अंगाला सुज चढणे आणि अशक्तपणा येणे अशी लक्षणं दिसतात. या त्रासामुळे गुदद्वारात खाज येणे, आग होणे, दुखणे यासारख्या समस्या उद्भवतात. मुळात जुलाबाची अनेक विविध कारणं असु शकतात. ज्यात व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, पॅरासिटिक अटॅक, फुड पाॅयझन, आणि साइड इफेक्ट या मूळ गोष्टींचा समावेश आहे.

१) केळी – केळी डायरियामध्ये खुप लाभदायक आहेत. कारण यात आढळणारे फायबर आपल्या शरीरातील आतडयांमधे असणारे तरल पदार्थ शोषुन घेतात. परिणामी शरीराला खुप मदत मिळते आणि साचलेला मळ सहजतेने जमा करून बाहेर काढते. याशिवाय केळ्यात पोटॅशियम असल्याने डायरियावेळी शरीर गमावलेले इलेक्ट्रोलाईट पुन्हा निर्माण होते. त्यामुळे केल्याचे सेवन जुलाब झाले असताना अत्यंत फायदेशीर आहे.
० यासाठी जुलाब झाले असतील तर, प्रत्येक तासाला १ पिकलेले केळ खावे. पिकलेल्या केळासोबत दही देखील दिवसातुन २ ते ३ वेळा खाल्ल्याने फायदा होतो. शिवाय कच्च्या केळाला शिजवून स्मॅश करावे, त्यात थोडासा लिंबाचा रस आणि चिमुटभर मिठ टाकुन जेवणाआधी खावे.

२) हळद – हळद एक प्रभावशाली औषधी आहे. त्यात असलेले अँटिबायोटिक गुणधर्म हानिकारक बॅक्टेरियाशी लढण्यास सक्षम असतात. आतडयातील सिंड्रोमला विकसीत करण्यासाठी देखील हळद उपयुक्त आहे. डायरिया आंतडयातील सिंड्रोम’चेच लक्षण आहे.
० यासाठी अर्धा चमचा हळद १ ग्लास गरम पाण्यात टाका. यानंतर चांगले मिक्स करून लगेच प्या. कारण हळद तळाला जाउन बसते. हे पेय दिवसातुन २ ते ३ वेळा प्या. शिवाय १ चमचा हळदीला १ चमचा अॅपल साॅस किंवा दहयात मिसळुनहि खाल्ल्याने फायदा होतो. दिवसातुन २-३ वेळा या मिश्रणाला घ्यावे.

३) दही – दही बॅक्टेरियाच्या प्रो बायोटिक’चा उत्तम स्त्रोत आहे. जो अगदी सहज पाचन तंत्रात मिसळून त्याची क्रिया सुरळीत करतो. दहयातील चांगले बॅक्टेरिया पोटाच्या आतडयांमध्ये गेल्याने डायरियाशी लढण्यास सहाय्य होते.
० यासाठी दिवसातून २ ते ३ वेळा दही खाणे फायद्याचे ठरते.

४) आलं – आलं एक उत्तम औषध आहे. ते पोटातील हाडांना मजबुत करते आणि जुलाबाला पुर्णपणे थांबवण्यास सहाय्य करते. शिवाय आलं डायरिया पसरवणाया बॅक्टेरियाला कमी करते आणि त्यांना शरीरातुन बाहेर काढते.
० यासाठी आल्याची बारीक पेस्ट दिड कप पाण्यात उकळावी. यानंतर ५ ते १० मिनिटे थंड करून घ्यावे. पुढे थंड झाल्यानंतर या काढयाला दिवसातुन २-३ वेळा प्यावे. शिवाय एक छोटा चमचा वाळलेल्या आल्याची पावडर, जीरे पुड, दालचीनी पावडर आणि मध मिश्रित करावे. यानंतर दिवसातुन २-३ वेळा याचे सेवन करावे.
महत्वाचे:- हाय ब्लडप्रेशर’ची ज्यांना समस्या आहे त्यांनी जास्त मात्रेत आल्याचे सेवन करू नये.

५) दालचिनी – दालचिनीत शक्तिशाली अॅंटीबॅक्टेरियल आणि अॅंटीव्हायरल तत्व असतात. जे नुकसानदायक आॅर्गन नष्ट करतात आणि पचनतंत्राला मजबुत करतात.
० यासाठी १ चमचा दालचिनी पावडर आणि अर्धा चमचा ताज्या आल्याचा रस एक कप गरम पाण्यात मिसळा. त्यानंतर ३० मिनीटे झाकून ठेवा. या पेयाला दिवसातुन २-३ वेळा प्या किंवा अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि १ चमचा मध एक ग्लास गरम पाण्यात चांगल्या रितीने मिक्स करून दिवसातुन कमीत कमी ३ वेळा याचे सेवन करा. शिवाय केळ्यावर दालचिनी पावडर टाकूनही खाता येते.

६) अॅपल व्हिनेगर – अॅपल व्हिनेगर हे नैसर्गिक अँटिबायोटिक असुन डायरियापासुन बचाव करण्यात सहाय्यक आहे. यात असलेले तत्व शरीरात डायरिया उत्पन्न करणाऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करतात. यासोबतच पोटातील pH लेव्हल नियंत्रित करण्यासदेखील अॅपल व्हिनेगर सक्षम आहे.
० यासाठी १-२ चमचे फिल्टर न केलेल्या अॅपल व्हिनेगरला १ ग्लास गरम पाण्यात टाकून त्यात थोडे मध टाका आणि हलवा. जोपर्यंत आराम मिळत नाही तोपर्यंत दिवसातुन किमान २ वेळा याचे सेवन करा.