nails

सतत नखे खात असाल तर …

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक आहेत कि ,त्यांना नखे खाण्याच्या सवयी या जास्त असतात. सतत कोणते  काम सुरु असेल किंवा कामाचे टेन्शन असेल तेव्हा काही लोकांचा हात आणि नखे हि डायरेक्ट तोंडात असलेली पाहायला मिळतात.  एखाद्या वेळी जर टेन्शन जास्त असेल जास्त प्रमाणात विचार सुरु असतील तर नखे  खाण्याची सवय असते.   ते आपल्या शरीराला अजिबात योग्य नाही अश्या वेळी कोणते उपाय करावेत म्हणजे नखे खाण्याचे प्रमाण हे कमी कमी होऊ शकते. ते जाणून घेऊया ….

— अनेक वेळेला कोणतेही संकट आले कि काही काम नसले तर आपली नखे तोंडात टाकायची आणि नखे चघळत बसायचे असे असेल तर मात्र ते योग्य नाही . आपल्या नखांमधील घाण हि पोटात जाऊन जंत होण्याची शकयता हि जास्त असते अश्या वेळी हि सवय दूर करायची असेल तर त्यावेळी तोंडात शेंगदाणा किंवा लॉलीपॉप असे काहीतरी तोंडात ठेवून सवय दूर करू शकता .

— जेव्हा नखे वाढतात तेव्हा आपसूकच कुरतडण्याची सवय पुन्हा सुरु होते. त्यामुळे नखे वाढूच देऊ नका. यामुळे या सवयीपासून सुटका होऊ शकेल.

—- ज्यांना ही सवय असेल तर एकाएकी ती बंद होणार नाही हळूहळू प्रयत्न करत राहा जेणेकरुन ही सवय पूर्ण बंद होईल. जाणूनबुजून काही प्रयत्न करून हि सवय दूर करा.

—- नखे कुरतडत असताना जर हाताला नेलपेंट   असेल तर मात्र ते शरीराला घातक आहे . त्यामुळे तोंडात नखे न जाण्यासाठी नखांना खूप घाण वास किंवा चव असलेले नेलपेंट लावा.

— नेलकटर चा वापर करा.