stylish hairstyle

सुदंर दिसण्यासाठी केस कापत असाल तर ……

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  आजकाल सगळीकडे फॅशन चा ट्रेण्ड सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक जण विशेष वेगळ्या प्रकारची आणि सगळ्या लोकांच्यात उठून दिसेल अश्या प्रकारची फॅशन करत असतात. मुलींमध्ये तर फॅशन म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा ट्रेण्ड असतो. त्याच्यासाठी फॅशन करणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीच असते. मुली आपल्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते अगदी कसे दिसायला हवे यापर्यंत च्या सगळ्या गोष्टींकडे विशेष भारी लक्ष असते. त्यामुळे मुली या हेअर कट पासून विशेष काळजी घेताना दिसतात.

मुलींच्या केसांची वाढ हि खूप लवकर लवकर लवकर होत असते. अश्या वेळी मुलींना आपल्या केसांची काळजी हि खूप घ्यावीच लागते. तसेच जर आपल्या केसांचे सौदर्य हे व्यवस्थित नसेल तर मात्र आपल्या दिसण्यात खूप बदल करावे लागतात. त्यासाठी आपल्या केसांची हेअर स्टाइल करणे आवश्यक असते. केसांच्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या हेअर स्टाइल आपल्याला शोभून दिसू शकतात. याबद्धल माहिती घेऊया …

बॅंग्ज हेअरकट —-

ज्या लोकांचे केस हे जास्त प्रमाणात कुरळे असतात त्या लोकांनी आपल्या केसांचा कट हा वेगळ्या पद्धतीने म्हणजे बॅग्ज कट करावा. कुरळ्या केसांसाठी खूप काळजी हि घ्यावी लागते. त्यांना मेंटेन करणे हे खूप अवघड असते. अश्या वेळी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा हेअर कट करू शकता. त्यानुसार तुम्ही तुमच्या केसांची वेगवेगळ्या पद्धतीने स्टाइल करू शकता. त्यामुळे तुमच्या सौदर्यात भर पडू शकेल. आणि तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आणि हटके दिसायला सुरुवात होऊ शकते.

ब्लंट हेअरकट —

केस लांबसडक असावे असं प्रत्येकीला वाटत असतं. पण केस जर लांब असतील तर आपल्याला आपल्या केसांची खूप काळजी घ्यावी लागते. त्याचे योग्य वेळेत केस धुणे तसेचज योग्य प्रकारचा हेअर कट करणे आवश्यक असते. पण इतक्या धावपळीच्या वातावरणात इतका वेळ हा आपल्या केसांना देणे अशक्य आहे. त्यामुळे लांब केसांसाठी ब्लंट हेअरकटचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे लांब केसांच्या मुली शॉर्ट कट करण्यावर जास्त भर दिला जातो.