|

पालकत्वाचे स्वप्न पाहत असाल तर ह्या गोष्टी ठेवा दूर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात एका गोड बाळाचे पालक होणे हि फार मोठी आनंदाची बाब असते. शिवाय आई होणे हि एका स्त्री साठी फार मोठी बाब आहे. त्यामुळे जर आपणही प्रेग्नंसीसाठी प्लॅनिंग करत असाल तर आधी या गोष्टींपासून दहा हात लांब राहा. फार महत्वाच्या अश्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनशैलीत बदल करणे अत्यंत गरजेचे असते. कारण आपला आहार आणि दैनंदिन क्रिया आपल्या आरोग्यावर नेहमी परिणाम करत असतात. मुख्य म्हणजे गर्भ धारणेसाठी वाईट सवयी अत्यंत मोठी समस्या निर्माण करू शकतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही अश्या गोष्टी सांगणार आहोत ज्या गर्भधारणेचे नियोजन करताना स्वतःपासून आणि आपल्या जोडीदारापासून लांब ठेवा. खालीलप्रमाणे:-

१) जर कपलमधील कोणाही एकाला धूम्रपान करण्याची सवय असेल तर हि सवय आधी मोडीस काढा. कारण धूम्रपान केल्याने स्त्रियांमध्ये वंध्यत्व वाढण्याचा धोका वाढतो. इतकेच नव्हे तर अकाली रजोनिवृत्तीची लक्षणे वेगाने दिसू लागतात. याचसोबत पुरुषांच्या शुक्राणूच्या गुणवत्तेवरदेखील परिणाम होतो आणि शुक्राणूची रचना यामुळे प्रभावित होत असते. परिणामी गर्भदारनेट समस्या निर्माण होतात.

२) संपूर्ण दिवसात बर्‍याचदा कॉफी पिण्याची सवय असेल तर ती वेळीच नियंत्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कॉफी जास्त प्यायल्याने प्रजननावर परिणाम होतो. इतकेच नव्हे तर गर्भधारण असेल तर गर्भपातदेखील होण्याची शक्यता असते.

३) पालकत्वाच्या प्लॅनिंगमध्ये अल्कोहोल पिण्याची सवय अतिशय घातक ठरते. त्यामुळे हि सवय एकतर नियंत्रित करा किंवा बंद करा. कारण जास्त मद्यपान केल्याने प्रजनन दर अत्यंत वेगाने कमी होतो. शिवाय गर्भधारण केलेला असेल तर गर्भातील बाळाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

४) उच्च-तीव्रतेने व्यायाम करणे देखील गर्भारपणाच्या प्लॅनिंगमध्ये अडसर होऊ शकते. यामुळे आपल्याला गर्भ धारण करण्यास वेळ लागू शकतो. याचे कारण असे कि, उच्च-तीव्रतेच्या व्यायामामुळे शरीरात हार्मोनल बदल झपाट्याने होत असतात. ज्याचा परिणाम स्त्रियांच्या मासिक पाळीवर दिसून येतो.

५) आजकाल दगदगीचे जीवन आणि त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया यांच्या वाढत्या मानसिक ताणामुळे गर्भधारणेसाठी समस्या उदभवते. यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येवर फरक पडतो आणि महिलांच्या शरीरात हार्मोनल असंतुलन होते. म्हणून जर गर्भ धारण करण्यासाठी तणाव टाळण्याचा प्रयत्न करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *