ghee

तुम्ही आहारात तूप घेत असाल तर …

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांबरोबर तुपाचा पण समावेश असणे आवश्यक आहे . तूप हे आरोग्यासाठी खूप लाभकारी आहे . तुपाच्या मदतीने आहारात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे त्या पदार्थांना चव आणि पौष्टिकपणा वाढण्यास मदत होते . तुपाचे फायदे हे लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळ्या लोकांना आहेत . लहान वयातील मुलांना तूप हे खायला दिले गेले पाहिजे . तूप हे कशा पद्धतीने आपल्या शरीराला फायदेशीर आहे ते जाणून घेऊया …

— तुमच्या हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप त्यामध्ये लुब्रिकेंटचे काम करते.

— जर तुम्हाला गॅस च्या समस्या या जास्त असतील तर अश्या वेळी तूप हे फायदेशीर ठरते .

— जर सतत जुलाब आणि उलट्या होत असतील तर त्यावेळी सुद्धा तूप हे आरोग्यदायी ठरते .

— उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं.

— ज्यावेळी तुम्ही डाळ शिजवाल त्यावेळी तूप टाकल्यावर गॅस होण्याचा त्रास कमी होतो.

— शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. शुद्ध तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं.

— हिवाळ्याच्या दिवसांत जर चेहऱ्यावर तूप लावत असाल तर मात्र चेहरा हा फुटला जात नाही आणि तसेच स्किन सुद्धा डॅमेज होत नाही .

— तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं हे आरोग्यासाठी अधिक उत्तम आहे.

— तूप हे स्निग्ध पदार्थांचा उत्तम स्रोत आहे .

— तुपामध्ये व्हिटॅमिन ए , डी आणि कॅल्शियम , फॉस्फरस अश्या सगळ्या पदार्थांचा समावेश असतो. देशी तूप हे सांधेदुखी साठी फार लाभकारक आहे .

— दररोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.

— शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते. तसेच आरोग्याच्या इतर समस्या या निर्माण होत नाहीत .

— तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते. तुमच्या हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप त्यामध्ये लुब्रिकेंटचे काम करते.

— आपल्या प्रतिकार शक्तीत वाढ होण्यासाठी तूप हे लाभकारक आहे .