dry papd

आहारात पापड खात असाल तर……..

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  पापड हा आपल्या आहारातील एक घटक आहे . पापडाच्या मदतीने जेवण केले तर जेवण हे जास्त जाऊ शकते . तोंडाला चव येण्यासाठी चटपटीत पापड हा खाल्ला जातो. आजकाल हॉटेल मध्ये सुद्धा जेवण करण्याच्या सुरुवातीच्या काळात पापड हा स्टार्टर मागविला जातो. हि एक नवीन पद्धत आहे . पापड हा खाण्यासाठी जरी योग्य असला तरी मात्र त्याचा आहारात जास्त वापर केला जाऊ नये . कारण पापड हा वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवला जातो. असे पदार्थ मात्र पचनाला कठीण असतात .

पापड हा महाराष्टरातील जेवणातील महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येक राज्यात पापड बनविण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या आहेत. राजस्थानमध्ये बेसनाचे, पंजाबमध्ये उडदाच्या डाळीचे पापड बनविले जातात. पापड भाजून त्यावर टोमॅटो, कांदा किंवा तिखट टाकून मसाला पापड आवडीने खाल्ला जातो. मात्र तो पचायला तीन ते पाच दिवस लागतात हे अनेकांना माहित नाही. पापड वजनाला हलके असतात, मात्र पचायला तेव्हढेच अवघड असतात. दोन पापडात एका चपातीएवढी कॅलरी असते. मुळात पापडखार टाकलेला पदार्थ हे पचायला जड असते . त्यामुळे किडनीच्या समस्या या वाढू शकतात. त्यामुळे ब्लड प्रेशर सुद्धा वाढते .

— तळलेला खा किंवा भाजलेला

पापड हा तळलेला खाल्ला जाऊ नये . कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात तेल हे अडकलेले असते . ते आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवण्यास सुरुवात करते . तो भाजला तर त्यावर आर्किलेमाइड तयार होते, जे एक न्यूरोटाॅक्सिन आहे आणि त्याला कार्सिनोजेनही म्हणतात. त्यावर सोडियम बेंझाइटचा प्रयोग यासाठी करतात की पापड जास्त दिवस चांगला राहावा. यामुळे कॅन्सर होण्याचा धोका मात्र वाढतो. पापड हा पचायला हा जड असतो. इतर पदार्थ हे कमीतकमी चार ते पाच तास पचायला लागतात . पण पापड हे कमीत कमी २४ तास पचायला जाते. म्हणून गॅस च्या समस्या या वाढायला सुरुवात होते .

पापड हा जास्त प्रमाणात खाल्ला तर त्याचा परिणाम हा आतड्यांवर होत असतो. त्यात फायबर नसल्याने ते पचायला खूप जड जाते . पापड हे आतड्याना चिकटून राहते . त्यामुळे आतड्याना त्रास हा जास्त होतो. पचनाची क्षमता हि कमी कमी होत जाते . आतड्यांमध्ये सडल्याने अनावश्यक बॅक्टेरिया तयार होतात. पापडांच्या आतड्यांमध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल हे कमी होऊ शकते . घरगुती पद्धतीने जे पापड वापरले असतील तेच आहारात खाल्ले जावे . पापड तयार करताना तो जास्त काळ टिकला जावा , म्हणून त्याच्यामध्ये पापडखार आणि मीठ हे जास्त टाकले जाते. त्यामुळे कदाचित ब्लड प्रेशर च्या समस्या या वाढू शकतात.