| | |

आरोग्यदायी स्प्राऊट्स किती, कसे आणि केव्हा खालं?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक लोक आपल्या आरोग्याविषयी फारच काळजी घेणारे असतात. त्यामुळे रोजचा डाएट कसा परफेक्ट हवा असा त्यांचा अट्टाहास असतो. त्यामुळे जवळजवळ रोजच हे लोक नाश्त्यामध्ये पौष्टिक पदार्थ खाणे पसंत करतात. यात प्रामुख्याने मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश असतो. यामध्ये मूग, मटकी, वाल, हरभरा, वाटाणा अश्या प्रकारची कडधान्ये समाविष्ट असतात. याचे कारण म्हणजे, मोड आलेली कडधान्ये अर्थात स्प्राऊट्स आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. शिवाय ते खाताना चविष्ट लागतात आणि सकाळी उठल्यावर नाश्त्यामध्ये खाल्ली तर शरीराला भरपूर मात्रेत प्रोटीन मिळते. पण तुम्हाला कधीतरी असा प्रश्न पडला आहे का? कि कडधान्ये आरोग्यासाठी लाभदायक आहेतच पण ती किती प्रमाणात खावी? कश्या पद्धतीने खावी? आणि मुख्य म्हणजे कोणत्या वेळी खावी? जर तुमची मान होकारार्थी हलत असेल तर लगेच जाणून घ्या या प्रश्नांची उत्तर खालीलप्रमाणे :-

० स्प्राऊट्स किती प्रमाणात खावे?
– मित्रांनो आपल्या घरातली मोठी माणसं नेहमीच आपल्याला रेटून सांगत असतात कि, अति तेथे माती. या म्हणीचा संबंध आयुष्यातील लहान सहन प्रसंगांइतकाच आरोग्याशीदेखील संबंध आहे. कोणत्याही पदार्थाचे वा पेयांचे अतिसेवन त्याच्या फायद्यांपेक्षा जास्त नुकसान करू शकते. त्यामुळे कडधान्ये देखील कितीही आरोग्यदायी असली तरीही ते खाण्याचे एक प्रमाण असावे. दररोज स्प्राऊट्स खात असाल तर छोटी वाटी स्प्राऊट्स खाणे निवडा. यासोबत सुका मेवा आणि अन्य ऊर्जादायी पदार्थांचे सेवन करा.

० स्प्राऊट्स खाताना कसे खालं?
– मोड आलेली कडधान्ये खाताना एक विशेष काळजी घेणे नेहमीच गरजेचे असते. कारण तज्ञ सांगतात कि, कच्च्या स्प्राउट्समध्ये हानिकारक जीवाणू असतात. त्यामुळे अश्या आहारातून विषबाधा होण्याची शक्यता वाढते. म्हणून स्प्राऊट्स खाण्याआधी ते एका पॅनमध्ये थोडे तेल घालून गरम करून घ्या वा मिठाच्या पाण्यात १० मिनिटे उकळून घ्या आणि मग खा.

० स्प्राऊट्स खाण्याची योग्य वेळ कोणती?
– स्प्राऊट्समध्ये अँटि ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन D सह अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी स्प्राऊट्स फायदेशीर आहेत. म्हणून स्प्राऊट्स सकाळी नाश्ता करताना खाणे चांगले आहे. असे केल्यास दिवसभर सतत भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदा होतो.

० कसे बनवालं स्प्राऊट्स?
– कडधान्यांना मोड येण्यासाठी आवडीच्या कडधान्याला काही तास पाण्यात भिजवा. सदाहरण ६-७ तासांनी कडधान्यं भिजून फुगतात. आता भिजवलेलं धान्य एका स्वच्छ कापडामध्ये रात्रभर बांधून ठेवा. यामुळे धान्याला व्यवस्थित मोड येतात.

० स्प्राऊट्समधील आरोग्यदायी गुणधर्म
– स्प्राऊट्समध्ये व्हिटॅमिन A, B, C, D आणि कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह असते. त्यासोबतच भरपूर फायबर, ओमेगा 3 फॅटी ऍसिड देखील असते.

० स्प्राऊट्स खाण्याचे फायदे

१) स्प्राऊट्स खाल्ल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यासाठी सकाळी नाश्ता करताना मोड आलेले कडधान्य खाणे फायदेशीर आहे. ज्यामुळे दिवसभर आपल्याला उत्साही वाटेल.

२) स्प्राऊट्समुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. रस्ताही मधुमेहींनी विशेषतः मोड आलेल्या मेथी दाण्यांचा आहारात समावेश करा. याचा चांगला फायदा होतो.

३) वजन कमी करण्यासाठी स्प्राऊट्स खाणे फायदेशीर आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पोट लगेच भरतं आणि वारंवार भूक लागत नाही.

४) स्प्राऊट्समध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. जे केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.