Thursday, January 5, 2023

भावनेच्या भरात जर तुम्ही कोणते निर्णय घेत असाल तर …

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो  आरोग्य  ऑनलाईन । आपल्या जीवनात कधी कधी अनेक निर्णय घ्यावे लागतात. प्रत्येक वेळेला ते निर्णय बरोबरच असतील असे नाही कधी कधी ते निर्णय सुद्धा चुकीचे ठरतात. हे आयुष्य आहे. त्यामुळे कधी चुकीचे तर कधी योग्य निर्णय हे होणारच . त्यामुळे घाबरून जाता कामा नये. अनेक वेळा जरी आपले निर्णय चुकत असेल तर घाबरून जाऊ नका. अनुभव यासारखा शिक्षक नाही . जर तुमच्या पाठीशी अनुभव हा जास्त असेल तर त्यावेळी तुम्हाला आपण चूक केली असे वाटत नाही.

विचार  न करता केवळ भावनांना वाट करून द्या. मग त्या चांगल्या असोत किंवा वाईट, महत्व देऊन तुम्ही जर असे निर्णय घेत असाल तर साहजिकच नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप व्हायची शक्यता असते. वाद किंवा विवाद झाले तर आपण कोणतेही निर्णय भावनेच्या भरात अजिबात घेऊ नयेत. त्याने आपल्याला त्रास हा जास्त होऊ शकतो. आपल्याबरोबर आपले इतर नातेवाईक सुद्धा त्या बरोबर भरडले जाऊ शकतात. जेथे वाद असतील त्यावेळी आपण कमीपणा घ्यायला शिकले पाहिजे.

अगदी नेहमी नाही पण आयुष्यात तुम्ही सुद्धा असे भावनांच्या आहारी जाऊन, सारासार विचार न करता, चुकीचे निर्णय घेत असाल.  चुका करणे हे माणूस असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे अशा चुका सगळ्यांच्याच होतात. पण याचा अर्थ असा सुद्धा नाही की चुकलेले निर्णय सोडून द्यावेत. चुका कुरवाळत न बसता, नव्याने सुरुवात करायची हे जरी खरे असले तरी, जर तुमच्याकडून वारंवार भावनांना प्राधान्य देऊन असे चुकीचे निर्णय घेतले जात असतील तर त्याचा तुमच्या  आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमच्या बरोबर इतरांच्या भावना पण जपणे हे जास्त महत्वाचे असते. जे निर्णय घेताना तुम्ही बुद्धीपेक्षा भावनांना जास्त महत्व देता ते धोकादायक ठरू शकतात.


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...