If you are not hungry at all ....

तुम्हाला भूक जर अजिबात लागत नसेल तर ….

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।   अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याला भूक अजिबात लागत नाही. कधी कामाचे टेन्शन तर कधी दररोजच्या कामकाजामुळे  भूक लागत नाही. अनेक वेळा जर आपण आजारपणतून नुकतेच उठलो असेल तर सुद्धा आपल्या जिभेला चव येत नाही त्यामुळे कोणतेच पदार्थ हे खाण्याची इच्छा होत नाही. कधीकधी भूक पण लागत नाही. भूक लागण्यासाठी कोणते उपाय करू शकता आणि त्याची कारणे काय आहेत ते पण जाणून घेऊया …

— कधीकधी काही मानसिक व्याधी सुद्धा यासाठी कारणीभूत असतात.

— अनेकदा टेन्शन, स्ट्रेस या कारणांचा सुद्धा भुकेवर परिणाम होतो.

— जर ऑफिस च्या कामाचा जास्त लोड जर आपल्यावर असेल त्यावेळी सुद्धा भूक अजिबात लागत नाही.

—- जेवण जर वेळेत घेत नसाल किंवा वेळ पाळत नसाल तर अश्या वेळी तुमच्या भुकेचे नियंत्रण राहत नाही.

— जर तुम्ही योग्य वेळेत जेवण करत नसाल तर मात्र तुमचे वजन हे कमी होऊ शकते. ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.

— दिवसभर थोडे थोडे खात राहा.

— भूक लागलेली नसताना समोर जेवणाचे ताट आले तर ते संपवायचे टेन्शन येऊ शकते किंवा कदाचित त्याकडे बघून अजूनच भूक मरू शकते.

— चौकस आहार करा . त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करण्यास मदत होऊ शकते.

— ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कॅलरीजमुळे वाढलेले वजन हे कधीच शरीराला योग्य नसते.

— जेवताना तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. कधीकधी एकट्याने अजिबात जेवण होत नाही.

— तुम्हाला जर भूक लागत नसेल, जेवण जात नसेल तर जेवणाच्या वेळी शक्यतो चार-चौघात मिसळल्याचा फायदा होतो.