work from home
|

जास्त वेळ बसून काम करत असाल तर ..

हॅलो आरोग्य ऑनलाईन । कोरोनामुळे जवळपास अनेक लोकांचे जॉब गेले आहेत. कोरोनामुळे घराच्या बाहेर पडता येत नसल्याने घरातच बसून अनेकांची कामे आहेत. घरात बसून राहिल्याने आपल्या शरीराच्या अनेक वेगवेगळ्या समस्या या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरात बसून राहण्यापेक्षा आपल्या शरीराला कोणत्या ना कोणत्या प्रकारची हालचाल असणे गरजेचे आहे. बसून काम केल्याने अनेक वेगवेगळ्या समस्या या निर्माण होऊ शकतात.

work from home

सतत बसून राहिल्याने आपल्या पोटाचा घेर हा जास्त वाढायला सुरुवात होते. सकाळी नाश्ता केला कि त्यानंतर लगेच कामासाठी बसून राहायचं. त्यानंतर जेवण केल्यानंतर लगेच काम करायचे . हे सगळे करत असताना आपल्या शरीराची कोणत्याही प्रकारे हालचाल होत नाही. आपल्याला असे वाटते कि आपण खूप काम करतो. पण सकाळपासून बसल्यानंतर फक्त आपल्या हाताची आणि आपल्या बोटांचीच हालचाल होताना दिसते. बाकीच्या गोष्टींची हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे हालचाल करणे गरजेचे आहे.

work from home

स्नायूंना काही प्रमाणात ताणाचं दिला नाही तर स्नायू हे बिनकामी होतात. त्यामुळे आपल्या शरीराला ताण देणे गरजेचे आहे. ताणच दिला जात नाही. ते शिथिल व्हायला लागतात. त्यामुळे शरीरातल्या रक्त वाहिन्या दाब पडल्यामुळे रक्ताभिसरण जसे व्हायला पाहिजे तसे होत नाही, आणि हृदयावर ताण पडायला लागतो. मग रक्तदाब, हृदय विकार अशा समस्या सुरू होऊ शकतात. दिवसभरातला थोडा वेळ आपल्या स्वतः साठी, काढायचा आहे. आपलं शरीर सुदृढ करायचं आहे. रोज आपला सकस आहार आणि नियमित व्यायाम करायचा आहे. त्यामुळे त्या वेळी व्यायाम करताना दररोज सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ तर व्यायाम करणे गरजेचा आहे. बसून बसून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणे आवश्यक आहे. बसल्यानंतर काही वेळाने पायांची हालचाल हि केली जावी.आहारात जास्त प्रमाणात चहा आणि कॉफीचे प्रमाण हे जास्त असणे सुद्धा चुकीचे आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना आपल्या पायांची हालचाल करणे आवश्यक आहे. त्याबरोबर सकस आहार हा घेतला गेला पाहिजे.