| |

उभे राहून पाणी पित असाल, तर आताच सावध व्हा!; का ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असे होते कि आपण बाहेरून येतो, दामलेलो असतो आणि थेट पाण्याचा भरलेला ग्लास किंवा बॉटल तोंडाला लावून उभ्यानेच घटाघट पाणी पितो. अगदी बसायचेही कष्ट घेत नाही आणि हेच आपल्या आरोग्याला नडते. कारण, शांतपणे एका जागी व्यवस्थित खाली बसून जेवण करणे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे पाणी पितेवेळी शांत असणे आणि बसलेले असणे अत्यंत गरजेचे आहे. आता तुम्ही म्हणाल का? कश्यासाठी? त्याने काय होतंय? तर मित्रहो ह्यामुळे खूप काही होवू शकत.

मुळात संपूर्ण दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे अनिवार्य आहे, हे डॉक्टरच सांगतात. त्यामुळे हे सर्वांना माहित आहे. मात्र घरातली मोठी मंडळी हजारदा सांगतात, कि ‘बाबा रे पाणी बसून पीत जा’, पण ते ऐकूनही आपल्याकडून दुर्लक्षित केले जाते आणि मग याचे वाईट परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात. काय ते जाणून घ्या..

  • मुळात पाणी पिण्याची योग्य पद्धत आचरणात असेल तरच पाणी पिण्याचा शरीराला फायदा होतो अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. बसून पाणी प्यायल्याने पॅरासिम्पॅटेपेटिक म्हणजेच स्नायू आणि मज्जा तंतूच्या एकत्रित सहभागाने होणाऱ्या प्रक्रिया रिलॅक्स आणि डायजेशन मोडवर असतात. त्यामुळे अन्नपचन आणि शारीरिक प्रक्रियांसाठी पाण्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो. मात्र उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक स्नायूंवर एकाचवेळी ताण येतो. यामुळे होणारे गंभीर परिणाम खालीलप्रमाणे:-

१) उभे राहून पाणी प्यायल्याने याचा परिणाम थेट शरीरातील अन्ननलिका आणि श्वसनलिकेवर होतो. परिणामी यातील ऑक्सिजनचा पुरवठा थांबण्याचा धोका संभवतो.

२) उभे राहून पाणी प्यायल्याने अन्ननलिकांवर दाब येतो आणि यामुळे पाणी अत्यंत वेगाने पोटात शिरकाव करते. यामुळे आपल्या पोटावर दबाव निर्माण होतो आणि पोटाच्या समस्या बळावतात.

३) पाण्याच्या वेगामुळे पोटात निर्माण झालेला दबाव पोट आणि पाचन संस्थेला इजा करतो. यामुळे पोटात जळजळ जाणवते.

४) पाण्याच्या या प्रेशरचा बायोलॉजिकल प्रक्रियेवर अत्यंत गंभीर परिणाम होतो. यामुळे उभे राहून पाणी पिण्याने आपल्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो.

५) जेव्हा पाणी अतिशय वेगाने पोटात प्रवेश करत असते तेव्हा, सर्व घाण आपसूकच मूत्राशयात जमा होते, परिणामी आपल्या किडनीचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

६) उभे राहून पाणी पिण्याच्या सवयींमुळे फुफ्फुसांसह हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते. शिवाय फुफ्फुसांशी संबंधित कोणताही आजार असेल तर तो आजार साहजिकच बळावतो.

७) घाईघाईने उभे राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखी अर्थात आर्थरायटिसचा त्रास होतो. याशिवाय तळव्यांना जळजळ जाणवते.

८) या सर्व समस्यांव्यतिरिक्त उभ्याने पाणी पिण्याने तहान भागत नाही. परिणामी तहान न शमल्याने आपण वारंवार अधिक पाण्याचे सेवन करतो आणि याचाही शरीरावर वाईटच परिणाम होतो.