pain killer

अंग दुखतंय म्हणून पेनकिलर गोळी घेत असाल तर …..

हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक वेळा  अंगदुखी , डोक्याला त्रास सुरु झाला तर त्यावेळी आपण पेनकिलर घेतो .  त्यामुळे आपल्याला आराम मिळण्यास मदत होते.  जे तीव्र दुखणे  असेल ते दुखणे कमी होण्यास  पेनकिलर  मदत करते . नेहमी   अंग दुखतंय म्हणून   आपण मसाज करण्यापेक्षा साधी एक गोळी खाऊन आपण आपले दुखणे दूर करण्याचा प्रयत्न  करतो.  जर नेहमी   शरीराचा कोणताही  भाग दुखतोय  किंवा आपले अंग दुखतंय म्हणून नेहमी आपण पेनकिलर जर खाल्ली तर ते आपल्या शरीराला घातक आहे. अश्या वेळी जास्त पेनकिलर खाण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. त्याचे  दुष्परिणाम हे खूप आहेत .

आपण जर साध्या साध्या आजारांसाठी जर पेनकिलर खात असाल तर अश्या वेळी मात्र ते शरीरासाठी घातक आहे . अश्या वेळी दररोज जर खाण्याची सवय झाली तर मात्र त्याचा आपल्या शरीरावर काही दिवसांनी त्याचा प्रभाव होणेच पूर्णतः कमी कमी होत जातो. त्यामुळे जरी तुम्ही पेनकिलर खात असाल तर त्यावेळी आपल्या दुखण्यात काहीच बदल हा जाणवणार नाही . त्यामुळे सतत पेनकिलर खाऊ नका . अनेक वेळा आपण कष्टाचे काम करतो . त्यावेळी खांदा कधी पाठ , कधी पाय अशी सारी दुखणे आपल्याला  त्रास देतातच . पण अश्या वेळी जर आपल्याला एक साधी गोष्ट सुचली गेली पाहिजे कि , आपण नेहमी पेनकिलर खाण्यापेक्षा आपल्या दैन्यंदिन दिवसांत आपणं व्यायाम हा केला गेला पाहिजे.सतत पेनकिलर खाण्याने  आपल्याला डोक्याच्या समस्या वाढतात, शरीराला सूज हो यायला सुरुवात होते .  पायाचे गोळे   वेदनादायक होतात.

जर आपल्याला कंबरेचा त्रास हा जास्त असेल अश्या वेळी आपल्या कंबरेची मालिश करणे आवश्यक आहे. आपला हात जिथपर्यंत पोहचत आहेत त्या ठिकाणापर्यंत आपण मालिश केली गेली पाहिजे. म्हणजे आपले दुखणे काही प्रमाणात कमी होते. आपला जर खांदा जास्त प्रमाणात दुखत असेल तर त्यावेळी आपल्या खांद्याला गरम तेलाच्या साह्याने मालिश करणे आवश्यक आहे. किंवा त्या ठिकाणी बाम लावून काही प्रमाणात मालिश करा. त्यामळे खांदा दुखी हि कमी प्रमाणात होत जाते. अश्या वेळी खूप जड वस्तू उचलणे बंद केले पाहिजेत. किंवा घरगुती  पद्धतीने  गरम पाण्याच्या मदतीने आपले अंग हे शेकले  जावे .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *