If you are taking pills to boost immunity ...
|

इम्युनिटी वाढवण्यासाठी जर तुम्ही गोळ्या घेत असाल तर…

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  कोरोनाच्या काळात आपली आहारात योग्य बदल करून आपली इम्युनिटी शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्या आहारात जर योग्य पदार्थांचा समावेश असेल तर आपली प्रतिकार शक्ती हि वाढण्यास मदत होऊ शकते. जर प्रतिकार शक्ती योग्य प्रमाणात वाढली तर मात्र कोणताही रोग किंवा आजार हा होत नाही. पण आजकाल प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप साऱ्या गोळ्या या बाजारात उपलब्ध आहेत. पण या गोळ्यांचे अनेक साईट इफेक्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील .

अनेक वेळा लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असेल तर त्यावेळी त्यांना गोळ्या खायला दिल्या जातात. पण कधी कधी या गोळ्यांचे त्यांच्या शरीरावर साईट इफेक्ट हे होताना दिसतात. लहान मुलांच्या शरीरावर कधी कधी पुरळ येण्यास सुरुवात होते ते कधी त्यांचे सारे शरीर हे लाल लाल दिसायला सुरुवात होते. त्यामुळे त्यांच्या शरीरावर खाज सुटायला सुरुवात होते त्यामुळे मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांना गोळ्या देणे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही.

अनेक वेळा मुलांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. पण त्याच्यासाठी तयार केलेल्या गोळ्या या रासायनिक पदार्थांचा वापर करून केल्या जातात. रासायनिक पदार्थ हे मुलांच्या आरोग्यासाठी तर अजिबात योग्य नाहीत. रासायनिक पदार्थांचा वापर हा जास्त असेल तर मात्र मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ हि अजिबात होत नाही. त्यामुळे मुलांची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी अजिबात गोळ्यांचा वापर हा केला जाऊ नये.