public toilet

बाहेर असताना सार्वजनिक टॉयलेट वापरत असाल तर, मात्र काळजी घेतली पाहिजे

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  प्रत्येक व्यक्तीला कामाच्या निमित्ताने काही काळ बाहेर राहावे लागते . त्यावेळी जर चुकून टॉयलेट ला जायची वेळ आली तर त्यावेळी पब्लिक टॉयलेट शिवाय मात्र कोणताच पर्याय नसतो. पण ज्यावेळी तुम्ही अशा टॉयलेटचा वापर करत असाल  तर त्यावेळी मात्र काळजी घेऊन त्याचा वापर केला पाहिजे . पब्लिक टॉयलेट वापरणे कधीही हानिकारकच असते . कारण त्या ठिकाणी अजिबात स्वच्छता नसते . ज्यावेळी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट ला जाता त्यावेळी मात्र काही प्रमाणात काळजी घेऊनच प्रवेश केला जावा .

सध्याच्या काळात आजूबाजूचे वातावरण हे कोरोनामय आहे . त्या काळात आपल्या स्वतःबरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे . ज्यावेळी तुम्ही कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जात असाल तर त्यावेळी मात्र नेहमी मास्क चा वापर करा . तसेच तुम्हाला इन्फेकशनपासून धोका हा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. ज्यावेळी तुम्ही मॉल किंवा विमानतळ अशा ठिकाणी जात असाल तर त्यावेळी तेथे खूप स्वछता असते. त्यामुळे शरीराला इतका असा धोका हा निर्माण होत नाही . पण तरीही काळजी घेणे गरजेचे असते .

— टॉयलेटमध्ये बिना मास्कचे जाऊ नका.

— वापर झाल्यावर हात स्वच्छ साबणाने धुवा.

— जास्त वेळ सार्वजनिक टॉयलेटमध्ये थांबू नका.

— सार्वजनिक टॉयलेटमधील कमीत कमी गोष्टींना स्पर्श करा.

— सार्वजनिक टॉयलेटमधील इतर लोकांपासून सुरक्षित अंतर पाळा.

— जास्त गर्दीच्या अथवा अस्वच्छ पब्लिक टॉयलेटचा वापर करणे टाळा.