| | |

मेथी दाण्याचे सेवन कराल तर होतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण अनेकदा विविध पदार्थांसाठी मेथीदाण्याचा वापर करतो असतो. मुख्य म्हणजे मेथी दाण्याला विशेष अशी चव असते जी अन्न पदार्थाची चव आणि त्याचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करत असते. मात्र हेच मेथीदाणे आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी अतिशय लाभदायक आहेत हे खूप कमी लोक जाणतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला मेथी दाण्याचे असे काही फायदे सांगणार आहोत जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही चकितच व्हाल. चला तर जाणून घेऊयात मेथी दाण्याचे फायदे :-

१) हृदयाचे संरक्षण – मेथी दाण्याच्या नियमित सेवनाने आपल्या हृदयास अतिशय फायदे होतात. कारण यामुळे आपले हृदय विविध रोगांपासून दूर राहण्यास मदत होते. शिवाय मेथी दाण्याच्या सेवनामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते आणि आपण आपले हृदय निरोगी राहण्यास मदतच होते.

२) मधुमेहावर नियंत्रण – मेथीचे दाणे हे मधुमेहाच्या रुग्णांना मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय लाभदायक असतात. यामुळे शरीरातील रक्तामधील साखर संतुलित राहते आणि हृदय रोगांचा धोका कमी होतो. याकरिता दररोज रात्री १ छोटा चमचा मेथीदाणे भिजवून ठेवावे आणि सकाळी काहीही खाण्यापिण्यापुर्वी चावून खावे आणि मग त्यावर पाणी प्यावे. यानंतर तासाभराने खावे.

३) केसांचे सौंदर्य – मेथी दाण्याचे सेवन किंवा मेथी दाण्याची पावडर अथवा लेप केसांच्या सौंदर्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. मेथी दाणे रात्रभर किंवा ४ ते ५ तासांसाठी भिजवून त्याची पेस्ट बनवून केसांवर लावली असता केसांचा रुक्षपणा नाहीसा होतो आणि केस देखील मजबूत होतात. शिवाय केसांना नैसर्गिक चमक येते.

४) वजनावर नियंत्रण – दररोज मेथी दाण्याची पूड खाल्ल्याने शरीरावरील वाढती अनावश्यक चरबी कमी होते आणि यामुळे वजन नियंत्रणात राहते. बदलत्या व गडबडीच्या जीवनशैलीत आपण अशा प्रकारे आपले वजन कमी करू शकता किंवा नियंत्रणात ठेवू शकता.

५) नैसर्गिक सौंदर्य – चेहऱ्याचे नैसर्गिकरित्या सौंदर्य वाढवायचे असेल तर यावर मेथीदाणे अतिशय प्रभावी आहेत. याकरिता मेथी दाण्याची पेस्ट बनवून ती चेहऱ्यावर लावल्याने आपली त्वचा घट्ट होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीश्या होतात आणि विशेष असे तेज येते. शिवाय हे कोरड्या आणि रुक्ष त्वचेसाठी त्वचेला ओलावा देते, यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि तजेलदार दिसते.