| | | |

किवीचे सेवन कराल तर इम्युनिटीची चिंता सोडून द्याल; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा डॉक्टर आपल्याला आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश करा असे वारंवार सांगत असतात. याचे कारण असे कि, निरोगी निरोगी आरोग्यासाठी नियमित एक किंवा दोन फळांचं सेवन करावं. आपल्या आरोग्याशी संबंधित कित्येक समस्यांवर नैसर्गिक औषध म्हणजे फळ खाणे. कारण फळांमध्ये अनेक असे घटक समाविष्ट असतात जे आपले विविध आजारांपासून संरक्षण करतात. आज आपण अश्याच एका आरोग्यवर्धक फळाची माहिती जाणून घेणार आहोत. हे फळ म्हणजे कीवी.

किवीमध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या तत्त्वांचे प्रमाण अधिक आहे. डेंग्यूची लागण झालेल्या प्रत्येक रुग्णाला कीवी खाण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण म्हणजे डेंग्यूच्या तापामुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. मात्र कीवीतील औषधी गुणधर्मांमुळे रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यास मदत होते. शिवाय कीवीच्या सेवनामुळे शरीराच्या आरोग्यासह त्वचेलाही पोषण मिळते. चला तर जाणून घेऊयात किवीचे आरोग्यवर्धक फायदे खालीलप्रमाणे :-

१) इम्यूनिटीत वाढ – कीवीतील पोषक तत्त्वांमुळे आपली इम्युनिटी सिस्टीम अर्थात रोगप्रतिकारक क्षमता वाढते. कारण कीवीत भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असते. जे रोगप्रतिकारक पेशी मजबूत करतात आणि घातक विषाणूंविरोधात लढण्यासाठी शारीरिक शक्ती वाढवतात.

२) दृष्टी सुधार – कीवीमध्ये ल्युटिन असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कारण रेटिना सुरक्षित ठेवण्यासोबत डोळ्यांशी संबंधित आजारांपासून बचाव करण्याचे कार्य ‘ल्युटिन’ करते. म्हणूनच, डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी आहारात कीवीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कीवीचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरेल.

३)​ मधुमेहावर नियंत्रण – मधुमेहापासून बचाव करण्यासाठी कीवी अतिशय फायदेशीर आहे. कारण यात अँटी-डायबेटिक गुणधर्म आहेत. शिवाय रक्तातील साखर कमी करण्यास उपयुक्त असे घटक देखील किवीत असतात. तसेच कीवीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते ज्यामुळे रक्तातील साखर लवकर वाढत नाही आणि मधुमेहावर नियंत्रण राखणे सोप्पे जाते. त्यामुळे मुधमेहाचा त्रास होऊ नये किंवा मधुमेह नियंत्रणात राहावा म्हणून आहारात कीवीचा समावेश जरूर करा.

४) कॅन्सरपासून बचाव – कॅन्सरमुळे हा एक गंभीर आजार आहे. यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून या आजारांपासून आपला बचाव होईल. यासाठी किवी आपली मदत करेल. कारण, कीवीच्या सेवनामुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्यास मदत मिळते, असे एका संशोधनात समोर आले आहे. कारण यामध्ये अँटी-कॅन्सरचे गुणधर्म आहेत. त्यामुळे आठवड्यातून ३-४ वेळा कीवी खाल्ल्यास कॅन्सरपासून बचाव होतो.

५) कमी होईल ​मुरुमांची समस्या – मुरुमांच्या समस्येमुळे अनेको लोक ग्रासलेले आहेत. अश्या प्रत्येकाने कीवीचे सेवन करा. कारण यामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ चे प्रमाण अधिक आहे आणि त्वचेच्या ते अतिशय महत्त्वाचे असते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून व्हिटॅमिन सी त्वचेचं संरक्षण करते. तर कीवीतील अँटी – ऑक्सिडेंटमुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी होते आणि चेहऱ्यावर येणारे डाग कमी होऊन त्वचेवर चमक येते.

६) ​केसांची वाढ – केस गळती, कोंडा, केसांची वाढ खुंटणे या समस्या आजकाल महिलांइतक्याच पुरुषांमध्येही आढळतात. त्यामुळे केसांशी संबंधित समस्यांचा त्रास कमी करायचा असेल तर कीवी फळ खा. कारण किवीतील ‘व्हिटॅमिन ए’ आणि ‘व्हिटॅमिन बी’ केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे केसांतील कोंड्याच्या समस्येपासून, केस गळतीपर्यंतचे त्रास कमी होतात आणि केसांची निरोगी वाढ होण्यास मदत होते.