| | |

विड्याच्या पानाचे कराल सेवन तर अनेक आजार होतील दूर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्याकडे परंपरागत पूजाविधीमध्ये विड्याच्या पानाला एक विशेष महत्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यासाठी विड्याची पाच पान ही हवीच. शिवाय एक काळ असा होता जेव्हा घरातील मोठी माणसं जेवल्यानंतर आवडीने विड्याचे पान अगदी कात आणि चुना लावून खायचे. पण आताची परिस्थिती पहाल तर विड्याची पाने घरात एखादी पूजाविधी असेल तरच आणली जातात. त्यामुळे घरात विड्याची पाने दिसणे अगदी दुर्मिळ बाब झाली आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. अजूनही अनेक लोकांना विड्याच्या पानांचा वापर धार्मिक विधींशिवाय होतो हेच माहीत नाही. म्हणूनच आज आपण या पानांचा औषधी वापर जाणून घेणार आहोत.

– विड्याच्या पानांना आयुर्वेदात खुप महत्व आहे. कारण या पानांमध्ये अनेक असे औषधी गुणधर्म असतात जे विविध आजारांवर अतिशय प्रभावी मानले जातात.

१) डोकेदुखीवर विड्याचे पान गुणकारी आहे. त्यामुळे डोकं दुखत असेल तर विड्याच्या पानांचा लेप कपाळावर ३० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने धुऊन टाका. यामुळे डोकेदुखी ताबडतोब थांबते.

२) इंडियन इन्स्टिट्युट ऑफ केमिकल बायोलॉजीने २०१२ साली केलेल्या संशोधनानुसार विड्याच्या पानात अशी तत्त्व आढळून आली आहेत जी ‘क्रॉनिक माइलॉइड ल्यूकेमिया’सोबत लढाण्यास उपयोगी ठरतात. या गुणधर्मांमुळे ‘बोन मॅरो कॅन्सर’ बरा होण्यास मदत होते.

३) पचनक्रिया सुधारण्यासाठी विड्याचे पान पाचकासारखे काम करते. शिवाय विड्याचे पान खाल्ल्याने शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढतो.

४) विड्याची पाने आपले शरीर मिनरल्स आणि पोषक द्रव्य घेऊ शकेल अश्या पद्धतीने कार्यरत असते. तसेच वजन कमी करण्यासाठीही विड्याची पाने उपयोगी ठरतात.

५) जर खोकला येत असेल आणि कफ साठत असेल तर यासाठी विड्याच्या पानात हळद टाकून ते चावून चावून त्याचा रस चघळत खावे. यामुळे खोकला लगेच थांबतो.

६) जर मुका मार लागल्यामुळे सूज आली असेल तर यावर विड्याचे पान हलके गरम करून बांधून ठेवा. हे पण बांधल्यामुळे चढलेली सूज उतरते.

७) लहान मुलांच्या पोटात खूप लवकर जंत होतात. त्यामुळे विड्याचे पान त्यांच्यासाठी उत्तम औषध आहे. विड्याच्या पानाचे रस मुलांना दिल्याने पोटातील जंतावरही आराम मिळतो.

८) विड्याचे पान चघळून खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी निघून जाते. इतकेच नव्हे तर, दररोज आंघोळीच्या पाण्यात विड्याची पाने टाकल्यास पाणी निर्जंतुक होते आणि शरीराला येणारी खाज दूर होते. यामुळे त्वचेच्या समस्या होत नाहीत.

महत्वाचे :- विड्याचे पान खाताना कधीही तंबाखूचा वापर करू नये. यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे विड्यात तंबाखू किंवा अन्य कोणत्याही अमली पदार्थांचा वापर करू नये.